राजकीय
स्वाती कोल्हे राज्य बालन्याय व संरक्षण निवड समिती (Judicial status) वर
शासनाकडून सामाजिक कार्याची दखल घेत केली निवड

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : कन्नड येथील मा.नगराध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती संतोष कोल्हे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य बालन्याय व संरक्षण निवड समिती(Judicial status) वर सदस्य म्हणून निवड झाली आहे. सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने स्वाती कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे शिफारशीने महाराष्ट्राच्या महिला व बालक विकास मंत्री ना.कु.अदिती तटकरे यांनी कोल्हे यांची नियुक्ती केली. स्वाती कोल्हे यांच्या नियुक्तीनंतर सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.





