उद्योग व व्यवसायकरिअरनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

भाजयुमोर्चाच्या नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीसपदी भूषण शिरोरे

पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार : शिरोरे

स्मिता पगार (कळवण प्रतिनिधी)

कळवण : भारतीय जनता युवा मोर्चाच्या नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीसपदी कळवण येथील उद्योजक भूषण शिरोरे यांची निवड करण्यात आली. नुकतच्या भाजपच्या नाशिक उत्तर जिल्हा बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम आणि भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीत शिरोरे यांच्याकडे जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भूषण शिरोरे हे कळवण येथील वाणी समाजाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक, भाजपयुवा मोर्चा कळवण शहराध्यक्षपदी, उद्योग आघाडीचे शहाराध्यक्ष असे विविध पदांवर काम केले आहे. तसेच श्रीराम सोशल फांऊडेशन संस्थापक अध्यक्ष असून फांऊडेशनच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी विविध चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिरे घेऊन अदिवासी भागात मोठे काम उभे केले असल्याने पक्षाने दखल घेऊन जिल्हा कार्यकारिणीत शिरोरे यांच्याकडे जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

निवड जाहीर झाल्यानंतर आयोजित सत्कार व अभिनंदन सोहळ्यास भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख , भाजपाचे महामंत्री नंदकुमार खैरनार, गोविंद कोठावदे, आनंद शिंदे, बापू पाटील, सुधाकर पगार, दिपक खैरनार, दादा मोरे, सतिष पगार,निंबा पगार, हितेद्र पगार, हेमंत रावले, चेतन निकम, यादव पवार, सचिन सोनवणे, काशिनाथ पाटील, राजेंद्र खैरनार, राजू शिंदे, संदीप अमृतकर , मयूर वाघ,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिरोरे यांची निवड जाहीर होताच त्यांचे संपर्क कार्यालय बाहेर भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्यात्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
पक्षाने जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करेन. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन मजबूत करणे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि युवकांसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर भर देईन. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहीन. : भूषण शिरोरे, नवनियुक्त सरचिटणीस, भाजयुमो, नाशिक उत्तर जिल्हा

गोशाळेलाचारा दान करा : फोन पे 8888947979 (विजयकुमार इंगळे, अध्यक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!