आरोग्यआर्थिककरिअरदेश-विदेशधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रमहिलाविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

नाशिकमध्ये २५ ऑक्टोबरला ‘राष्ट्र सेविका समिति’चे सघोष पथसंचलन

एच.पी.टी.महाविद्यालयाच्या मैदानावर ध्वजपूजन व शस्त्रपूजन आणि दोन स्वतंत्र पथसंचलनांचे आयोजन

नाशिक, प्रतिनिधी : राष्ट्र सेविका समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजपूजन, शस्त्रपूजन आणि घोषासह पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता नाशिकमधील एच.पी.टी. आर्ट्स अँड आर.वाय.के. सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दिप्ती देशपांडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शस्त्रपूजन तसेच ध्वज पूजन कार्यक्रम होणार आहे.

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याने वाहतुकीची संभाव्य कोंडी टाळण्यासाठी यंदा दोन स्वतंत्र मार्गांवरून पथसंचलन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही संचलने वेगवेगळ्या मार्गांनी मार्गक्रमण करून एच.पी.टी. महाविद्यालयाच्या मैदानावर परत येऊन समाप्त होतील.

पथसंचलनाचा पहिला मार्ग –

एच.पी.टी. महाविद्यालयाच्या मैदानावरून संचलनाला प्रारंभ होईल. गुरुदक्षिणा हॉलकडील मिलेनियम गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळत वृंदावन मिसळ येथून पुढे मार्गक्रमण केले जाईल. त्यानंतर डावीकडे वळून बाईज टाऊन चौकातून सरळ जात सहजीवन कॉलनीतील गेट क्रमांक १ समोरील गल्लीमार्गे संचलन पुढे जाईल. पुढे डावीकडे वळून मालपाणी हॉस्पिटल चौकातून सरळ मार्गाने व्हिजन हॉस्पिटलच्या दिशेने जाऊन डावीकडे वळून महाविद्यालय रोडने श्रद्धा मॉलपर्यंत संचलन जाईल. तेथून डावीकडे वळून एच.पी.टी. महाविद्यालयाच्या गेटमार्गे पुन्हा मैदानावर परत येत संचलनाची सांगता होईल.

पथसंचलनाचा दुसरा मार्ग-

दुसरे संचलन एच.पी.टी. महाविद्यालयाच्या मैदानावरून सुरू होऊन गुरुदक्षिणा हॉल व मिलेनियम गेटमार्गे बाहेर पडेल. त्यानंतर डावीकडे वळून कॉलेज रोडवरील सिसलजवळून पुढे जाईल. डी. डेकॉर येथून सरळ जात मॉडर्न कॅफेजवळून डावीकडे वळल्यानंतर रघुकुल बिल्डिंग, कुलकर्णी बाग, कलश अपार्टमेंट परिसर आणि ब्रँड लाउंज जवळून उजवीकडे वळत संचलन पुढे जाईल. पुढे कॉलेज रोडवरील सिग्नल, श्रद्धा मॉलमार्गे एच.पी.टी. महाविद्यालयाच्या मिलेनियम गेटपर्यंत येऊन तेथून पुन्हा मैदानावर परतत संचलनाची सांगता होईल.

शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सुरू असलेली विकासकामे लक्षात घेऊन दोन्ही पथसंचलनांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विजयादशमीच्या परंपरेनुसार ध्वजपूजन, शस्त्रपूजन आणि शिस्त, संघटन व सामूहिक शक्तीचे दर्शन घडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!