रिदम डान्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे होतेय सर्वत्र अभिनंदन
राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभाग


नाशिक : ए बी कला भाव आर्ट फाउंडेशन आयोजित कोथरूड पुणे येथील ऋत्विक सभागृहात झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सब जुनिअर सेमी क्लासिकल कथ्थक प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक ट्रॉफी , मेडल आणि सर्टिफिकेट मिळाले. या राष्ट्रीय स्पर्धेत नृत्य स्पर्धेत पुणे नासिक मुंबई हैदराबाद बेंगलोर दिल्ली येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

रिदम डान्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका गंधाली होशिंग खिस्ते, नृत्य प्रशिक्षिका यांच्या विद्यार्थिनींनी सान्वी चांगडे व श्रीनिका देशपांडे यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्य सादरीकरणातून राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून संस्थेचा गौरव केला.या यशामागे विद्यार्थिनींची अथक मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षिकेची मेहनत व समर्पण यांचा मोलाचा वाटा आहे.

प्रत्येक पावला मागे मेहनत होती, प्रत्येक हालचाली मागे सराव होता आणि प्रत्येक सादरीकरणा मागे एक सुंदर स्वप्न होतं.विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांच्या एकत्रित. मेहनतीला मिळालेले हे यश खरोखरच अभिमानास्पद आहे.




