नवे नाशिक जेष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य रमले धार्मिक सहलीत


नाशिक (प्रतिनिधी) : नवे नाशिक जेष्ठ नागरिक मंडळ नाशिक च्या वतीने मंडळाच्या सभासदांची सहकुटुंब सहल मंगळवार दिनांक २७/ १० / २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती . सहलीस ५५ सभासद बंधू भगिनी सहभागी झाले होते . सहलीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसले व त्यांच्या संचालक मंडळाने केले होते.

प्रथमतः सकाळी बरोबर ५.३० वाजता सहलीसाठी आणलेल्या बसची पूजा करण्यात आली . मंडळाचे सभासद सकाळी सहा पर्यंत हजर झाले . प्रथम विघ्नहर्ता गणपतीचे नाव घेवून जयजयकार करण्यात आला . सहलीचे प्रथम स्थान मांडसांगवीचे दत्त मंदीर होते . आम्ही मंदीरात गेलो तर तेथे दत्तगुरुची आरती चालू होती . सर्वानी आरती केली . मनोभावे दर्शन घेवून पुढील प्रवासास प्रारंभ केला . पुढचे ठिकाण म्हणजे ओढा येथील गणपती . सर्व जण गोदातिरी असलेल्या भव्य गणपती मंदिरात दाखल झाले . सर्वानी मनोभावे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले . मंदीर परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर होता . मंदीरा समोरील महादेवाच्या मंदाराचे दर्शन घेवून पुढील प्रवासास निघालो . याच वेळी अतिशय गोड आवाजाची देणगी असलेले डॉ. सुभाष शेंडे यांनी गीत सादर केले .

रमत गमत आमची गाडी बोकडदऱ्याच्या म्हसोबा मंदीराजवळ थांबली . सर्वांनी म्हसोबाचे दर्शन घेवून नैताळे येथे कूच केले . नैताळ्यात मतोबा महाराजाचे अतिशय सुंदर मंदीर आहे . गावाजवळून छत्रपती संभाजीनगर हायवे जातो . तेथे तेथील प्रसिद्ध ऊसळपाव वर ताव मारून आम्ही पुढील प्रवासास निघालो . आमचे पुढचे ठिकाण होते धारणगावची कामाख्या देवीचे मंदीर . नुकतेच नवरात्र संपल्यामुळे त्याचे अवशेष मंदीर परिसरात विखुरलेले होते . मंदीर अतिशय प्रशस्त आणि सुंदर आहे . सर्वानी प्रथम नवनाथ व सर्व देवी माताचे दर्शन घेवून खाली गुहेत असलेल्या कामाख्या मातेचे दर्शन घेतले . नंतर गायक डॉ. सुभाष शेंडेच्या गीतावर सर्वांनी ठेका धरला .



मंदीर एवढे सुंदर आहे की तेथून पायच निघत नव्हता . तेथून आम्ही खेडलेझुंगे या पवित्रस्थळी आलो. प्रथमतः आम्हाला हनुमानाच्या पवित्र भव्य मूर्तीचे दर्शन झाले . तेथून आम्ही अतिशय सुंदर परिसराकडे आलो. तेथे स्वर्गीय तुकारामबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले . समाधी परिसर अतिशय सुंदर फूलझाडे वृक्षवेलीनी सुशोभित आहे. तेथील निसर्ग सौदर्याचा आनंद घेवून आम्ही सांगवीच्या दत्तमंदीराचे दर्शन घेतले. तेथून आम्ही मंजूर येथील शिवानंद महाराजाच्या मठाकडे आलो . मठ परिसर अतिशय सुंदर आहे . शेजारी गोदावरी नदीवर बांध घालून पाणी अडवले आहे . तो प्रचंड जलाशय पाहून सर्व जण हरकून गेले . तेथून आम्ही कोपरगाव येथे आलो . आता सर्व मंडळी थकलेली होती . यादरम्यान आमचे सहप्रवाशी गायक अनिल देवरे तसेच येवले, जाधव व डॉ. शेंडे यांनी गीते सादर केली . विशेषतः कानबाईच्या गीतानी बहार आणली . श्री अविनाश चव्हाण यांनी विनोदी चुटके सांगितले .




तेथून आम्ही कोपरगाव बेट येथील दैत्य गुरू भीष्माचार्याच्या मंदीरात आम्ही प्रवेश केला. मंदीर अतिशय पुरातन आणि सुंदर आहे त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून बाहेर आलो तर आमच्या अध्यक्षांनी आमच्यासाठी चहाची व्यवस्था केली होती . चहापान केल्यानंतर आम्ही संत जर्नादनस्वामी च्या समाधीचे दर्शन घेतले . समोर काशीविश्वेशराचे मंदीर आहे . मंदीर परिसर पाहण्यासारखा आहे . आता संध्याकाळ होत आली होती . तेथून पुढे आम्ही कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात आलो . तेथील प्रचंड मोठे शैक्षणिक संकूल ध्यानधारणा हॉल पाहिला. तेथील सर्व सेवेकरांनी आमची चोख व्यवस्था ठेवली. आम्हाला महाराजाचे दर्शन झाले . महाप्रसादाचा मनसोक्त आनंद लुटला.

परतीच्या प्रवासाला लागलो . रात्री 9.30 वाजता सुखरूप नाशिक येथे पोहचलो. या सहलीचे नियोजन अध्यक्ष आप्पासाहेब देसले, उपाध्यक्ष रामदास शिंपी, सचिव भगवान जाधव तसेच खजिनदार शिरोरे यांनी केले . त्यांना पाठक, अविनाश चव्हाण, गंवादे, अनिल देवरे, सूर्यकांत सोनवणे, शीतल पाटील, गारसे व सर्व संचालक मंडळ व सभासदानी सहाय्य केले.




























