
नाशिक : शहरातील जिरे माळी समाज नामसूची अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच नामसूची प्रकाशित होत आहे.
नाशिक शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या जिरे माळी समाजातील सदस्यांची एकत्रित माहिती असलेल्या नामसुचीचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि जिरे माळी समाज विकास समितीचे अध्यक्ष रमेश साळुंखे यांनी सांगितले.
जिरे माळी समाज विकास समितीचे कार्याध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत.
मान्यवरांच्या हस्ते नामसुचीचे प्रकाशन नाशिक येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष रमेश साळुंखे यांनी दिली. नामसूचीसाठी समाजबांधवांनी आपले पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, निवासाचा पत्ता, नोकरी, व्यवसायाचे ठिकाणी आदी माहिती 94222 58447 या क्रमांकावर कळवावी.





