गोशाळेत वाढदिवस साजरा करणे, मानले जाते पवित्र
नाशिकच्या गंगापूर येथील श्रीकृष्णा गोशाळा आणि शिवसुमन वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करूयात

होय, आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींचा वाढदिवस गोशाळेत अतिशय पवित्र आणि मंगलमय पद्धतीने साजरा करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये गोशाळेत साजरा करण्याचे अनेक फायदे आणि उत्तम मार्ग आहेत. यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गाईंना चारा, गूळ किंवा हिरवा चारा खाऊ घालणे हे एक मोठे पवित्र आणि पुण्य कार्य मानले जाते.

आयुष्यात एकदाच मिळालेल्या जन्माला सार्थकी लावताना महागड्या पार्ट्या करण्याऐवजी, गोशाळेत गाईंची सेवा करून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. तुम्ही गोशाळेला आर्थिक मदत करू शकता किंवा गाईंच्या औषधोपचारासाठी, निवाऱ्यासाठी योगदान देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या वाढदिवसाला एक उदात्त, पवित्र आणि सामाजिक हेतू मिळतो.

गोशाळेतील शांत आणि पवित्र वातावरणात वेळ घालवल्याने मनाला शांती मिळते. धार्मिक ग्रंथानुसार, वाढदिवस तिथीनुसार साजरा करून सकाळी देवदर्शन आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. गोशाळेत वाढदिवस कसा साजरा करावा? आपल्या जवळच्या गोशाळेशी संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या प्लॅनबद्दल सांगा. तुम्ही गोशाळेत केक कापण्याऐवजी, तिथे गाईंना हिरवा चारा, सुका चारा किंवा गूळ खाऊ घालून सेलिब्रेशन करू शकता. याशिवाय, वृद्धाश्रमात काही काळ घालवू शकता. नाशिकमध्ये गोशाळा आणि वृद्धाश्रम दोन्हींची एकाच ठिकाणी व्यवस्था उपलब्ध झाली आहे… होय, नाशिकच्या गोवर्धन शिवारात, मुक्त विद्यापीठ रोडवर, गंगापूर गावाच्या पुढे श्रीकृष्णा गोशाळा आणि शिवसुमन आनंदाश्रम आहे… या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी छान ठिकाण आहे. गोशाळेत वाढदिवस साजरा करणे, ही एक नवीन, सात्विक आणि समाजासाठी उपयुक्त अशी धार्मिक परंपरा आहे. नक्कीच ही पोस्ट फॉरवर्ड करा… सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम…







