क्रीडा
रोहितनंतर विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर क्रिकेटप्रेमी नाराज… पुनर्विचार करण्याची होतेय मागणी.


मुंबई (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला… विराट कोहलीने निवृत्तीबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
क्रिकेटप्रेमी म्हणतात, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. रोहित शर्माच्या निवृत्तीचं दु:ख होत असताना आणखी एक धक्का पचवणं आम्हाला अवघड जातं आहे. विराट कोहलीने निवृत्ती मागे घ्यावी, यासाठी त्याला सर्वत्र विनंती करत आहेत. आपल्या निवृत्तीबाबत पुन्हा विचार करण्यास सांगत आहेत




