
नाशिक (नरेंद्र जोशी, प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची सेकंड इनिंग आनंदाने जगता यावी, या उद्देशाने नाशिकच्या गंगापूर गावाजवळ सुरू झालेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमला नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातील एम.ए. सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती.

देशातील पहिल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबला विद्यार्थ्यांना भेट देत विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाचनालय, मनोरंजन विभाग, सिनेमा थिएटर तसेच अन्य उपक्रमांची माहिती जाणून घेतली.



केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सीनिअर सिटीझन क्लबला भेट.
प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच भविष्यात जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमची वाढती जबाबदारी तसेच अन्य उपक्रमांची माहिती दिली. या प्रकल्पात कायमस्वरूपी निवासासाठी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. डॉ. सारिका क्षीरसागर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास दौऱ्यात विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांतर्फे विद्यापीठाला सादर करण्यात येणार आहे.
हे आहेत जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमचे आधारस्तंभ : विजयकुमार इंगळे (अध्यक्ष), सुमन जाधव (उपाध्यक्ष), डॉ. उज्ज्वला निकम (वैद्यकीय संचालक), सुषमा गायकवाड (संचालिका), दत्तात्रय वाणी (संचालक), सुषमा सोनवणे (संचालिका), डॉ. सोनाली पाटील (संचालिका), अर्चना पाटील (संचालिका), मालती इंगळे (सचिव). याशिवाय, जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमतर्फे गंगापूर येथे गरजू, गरीब कुटुंबातील मुलांसाठी मोफत इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आली आहे.



