देश-विदेश

कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली गीतेवर हात ठेवून शपथ. मंत्री अनिता आनंद.

वृत्तसंस्था : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी नुकतीच आपल्या मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलात वंशाच्या अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी डलहौसी युनिव्हर्सिटी आणि टोरोंटो युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी कॅनेडियन वकील आणि व्यावसायिक कार्यकारी जॉन नोल्टन यांच्याशी विवाह केला.

नुकत्याच पुन्हा निवडून आलेल्या लिबरल सरकारच्या स्थापनेअंतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. अनिता आनंद यांनी गीतेवर हात ठेवून नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. त्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनणाऱ्या पहिल्या हिंदू महिला देखील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!