शहर

सातपूर परिसरातील धोकादायक वृक्ष तातडीने हटवा

रोहिणी देवरे यांची निवेदनाद्वारे मागणी.

सातपूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सातपूर परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी अशी मागणी शिवसेना महिला उपमहानगरप्रमुख रोहिणी देवरे यांनी मनपा उद्यान विभागाचे उपायुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे कोसळणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातपूर परिसरामध्ये सातपूर कॉलनी, अशोकनगर, सावरकरनगर, राज्य कर्मचारी वसाहत, वास्तुनगर, विश्वासनगर, राधाकृष्णनगर यासह अनेक भागांमध्ये मोठे वृक्ष असून काही वृक्ष प्रचंड मोठ्या विस्ताराचे असून त्यांच्या फांद्या कमी करणे गरजेचे आहे.

पावसाळा सुरू झालावर व अवकाळी पाऊस आल्यावर वादळी वाऱ्यात अनेक झाड उनमळून पडलेली दिसतात, यंदाही अवकाळी पावसामुळे हे चित्र सातपूरमध्ये बघायला मिळत आहे. झाड पडल्यामुळे नाशिक शहरात अनेक जण जखमी झाले तर काहींना आपला जीव गमावावा लागला. अनेक भागांमध्ये झाडांमुळे वीज खंडित होते. वाहनांचे नुकसान होणाऱ्या घटना तर अगणित आहेत. तरी महापालिकेच्या उद्यान विभागाने वेळ न घालवता सातपूर भागातील धोकादायक झाडांची यादी तयार करून तातडीने वृक्षांच्या फांद्याची छाटणी करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!