विशेष

ज्येष्ठांनो… आयुष्याची सेकंड इनिंग जगा आनंदाने…! वयाला विसरा… छंद जोपासा…!

सावळीराम तिदमे (सामाजिक कार्यकर्ते, नाशिक)

॥अंतरयात्रा॥

(क्रमशः)
आयुष्याची सेकंड इनिंग सुखकर , स्वात्मानंदी , परमानंदी करण्यासाठी ..
आयुष्याची पहिली इनिंग खेळून झालीय .
जबाबदाऱ्या , कर्तव्ये पार पाडली . पण सेकंड इनिंगचा क्रिकेट सर्वांगसुंदर , उत्साहवर्धक , भन्नाट आणि दिलखुलास करण्यासाठी एक सुंदर संकल्पना आविष्कृत केलीय .
निसर्गसौंदर्याची रेलचेल ती सुध्दा श्रीक्षेत्र नाशिकपासून हाकेच्या अंतरावर ……
पण हे काय आहे ?🦚🌾
कशासाठी आहे ?🦚🌴🪴
कुणासाठी आहे ?🦚🌄🌻
हे सर्व करण्याचा हेतू काय ?🦚
अगदी बरोबर . समजून घेऊ या, जाणून घेऊ या जय शंकर विजयांगण काय आहे ?सिनिअर सिटीझन क्लब ?
एका तरूणाने हे धाडस केलंय 👏💐 होय,
सद्गुरू श्री शंकर महाराजांचा एकनिष्ठ भक्त असलेल्या या तरुणाने वर्तमान , भवताल याचा सखोल अभ्यास करून ज्येष्ठांचे अंतरंग खुलविणारी , ज्येष्ठांच्या कलागुणांना व्यासपीठ व प्रेरणा देणारी जय शंकर विजयांगण संकल्पना कार्यान्वित केली . तुमचा विश्वास बसणार नाही नाममात्र चारशे रुपये सेवाशुल्कात सुविधांचे घबाड ज्येष्ठांसाठी… बसने तुम्हाला घेऊन जाणार पुन्हा सोडून देणार . चहा , नाश्ता , सुग्रास सात्विक शाकाहारी भोजन , सांस्कृतिक कार्यक्रम , मनोरंजन व खूप काही फक्त 400/- रुपये सेवाशुल्कात .
कसं शक्य आहे ?🦚🌄🌻खरं वाटत नाही .
म्हणूनच हे आनंदस्थळ प्रत्यक्ष बघून अनुभव घ्यायला हवा.
ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्याची सुंदर सोय,
मनोरंजन .🌅🌴💦🌻🥗
इनडोअर व आऊटडोअर गेम 🌅🌱🎋
टेंटस् ची व्यवस्था
२४ तास वैद्यकीय सेवा
कराओके गायन सुविधा 🌅🎋
प्रशस्त हॉल 🪷💦🕉️
सिनेमागृह 🪷🌄🦚🚩🌻
जुन्या काळातील गाण्यांचा आनंद 🪷
वाचनालय 📚📗📕📖👑
योग , ध्यान , हास्यक्लबची सुविधा 🌌☄️🕉️💦🚩
याशिवाय बरंच काही …………
एवढया कमी खर्चात कसं परवडतं ?
कमावण्यासाठी हा प्रकल्प नाही .🕉️🕉️🕉️
सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या प्रेरणेने व कृपेने जागा भाडेतत्त्वावर घेऊन ही योजना सुरू केलीय .👏💐
धनद्रव्य , सत्ता , संपत्ती , हौसमौज , प्रसिध्दी , प्रतिष्ठा , सत्कार , पुरस्कार , पदे , संग्रह , उपभोग , फायदा ,लोभलाभ अशा घटकांच्या भोवती तरूणाई पिंगा घालतेय अन् तुम्ही हे काय सुरू केलंय ?
त्याचं मूळ मातृपितृ देवता व सद्गुरूकृपा आहे .🕉️🌌🦚👏💐👏💐👏💐🌹🌷🌲🌺🌴
मी जे सेवाकार्य करतो त्यातून ज्येष्ठ खुलतात , आनंदीत होतात .जेंव्हा ते या जय शंकर विजयांगण मध्ये येतात तेव्हा मला फार आनंद होतो . मला प्रत्येकात सद्गुरूंचं दर्शन घडतं🕉️ . त्यामुळे मी समर्पित होतो . या ठिकाणी आलेल्या प्रत्येक जेष्ठाच्या अंतःकरणातून माझ्यावर दुवा व आशीर्वादांचा भरभरून वर्षाव होतो 💧💦🫧. हेच माझं सर्वस्व , हीच माझी धनदौलत . 🙏स्वार्थ , लोभ , फायदा यासाठी तर सगळेच धावतात , जीवाचं रान करतात . पण स्वार्थ , लोभ , फायदा याशिवाय जगण्याचा रस्ता मला🕉️🚩 सद्गुरूंनी दाखवला .

ज्येष्ठांचे थवेच्या थवे इथं येऊन मनसोक्त आनंद घेतात तेंव्हा सद्गुरू म्हणतात तू देणारा बनला , समर्पित झाला ,सेवक बनला हा मनुष्यत्वाचा सर्वोच्च पुरस्कार आहे .🕉️👏💐 इतरांना सुखी , आनंदी , उत्साही , प्रसन्न करण्यासाठी हा प्रकल्प , योजना आहे . सर्व वयोगटांना लाभ घेता येतो .
एक दिवस अगोदर 7720030574
7721086778 या नंबरवर बुकिंग केलं की
जय शंकर विजयांगण आपल्या सेवेत .
ज्येष्ठ नागरिक मंडळे
हास्य क्लब
ज्येष्ठांच्या विविध संस्था , संघटना , समुह या ठिकाणी येऊन विविध कलागुणांचे सादरीकरण करतात व आस्वाद घेतात . स्वानुभवातून Mouth Publicity होते आहे . श्रीक्षेत्र नाशिकच्या कानाकोपऱ्यात ज्येष्ठांच्या अंतरंगात चर्चा आहे

जय शंकर विजयांगणची, आत्मानंदी प्रकल्पाची . खरं म्हणजे ही संकल्पनाच अफलातून आणि भन्नाट आहे . नाचायला मिळतं , गायला मिळतं . मिमिक्री करता येते . व्याख्यान देता येतं , प्रवचन , कीर्तन सर्व काही . फक्त तुमच्यासाठी .सहकुटुंब या , मित्र परिवारासह या . तुमच्या संपूर्ण मंडळाला घेऊन या . आजपर्यंत असा अनुभव आणि आनंद तुम्ही कधीच घेतलेला नाही . या विजयांगणच्या बोलक्या भिंती वाचता वाचता तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल . किती प्रकारचं ज्ञान , अक्षरविज्ञान . बरं ही विजयांगणची सेवाधारी सुहृदांची टीम खूप जिव्हाळ्याने , प्रेमाने सेवा देते . सद्गुरू शंकर महाराज मंदिरातून आध्यात्मिक उर्जेचे अखंड प्रक्षेपण सुरू असते.

जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब , विरंगुळा केंद्र म्हणजे श्रीक्षेत्र नाशिकची शान आहे . संपूर्ण भारतात अशी संकल्पना , असा प्रकल्प , अशी अभिनव योजना फक्त आणि फक्त श्रीक्षेत्र नाशिकमध्येच आहे , हे आपणास माहित आहे काय ?
॥जय शंकरबाबा॥

संपर्क : 8007975760

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!