राजकीय

नाशिक महापालिका निवडणूक प्रभागरचना 4 सदस्यीय

लवकरच निवडणुका जाहीर होणार, निवडणुकांचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीसह ‘ड’ वर्गातील एकोणीस महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषदांसाठी दोन सदस्यीय, नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय तर महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग रचना तयार केली जाणार असून संपूर्ण अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.

प्रभागरचना निश्चिती…
महापालिकेसाठी 4 सदस्यांचा प्रभाग
नगरपरिषदांसाठी 2 सदस्यांचा प्रभाग…
गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या आणि नगरपरिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होत आहे…
राज्यातील महापालिका आणि नगरपरिषद निवडणूक लवकरच जाहीर होणार

अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली

महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना हे आदेश देण्यात आले आहेत. अ, ब आणि क वर्गाच्या महानगरपालिकांच्या प्रभागांची पुन्हा नव्याने बहुप्रभाग रचना करण्यात येणार आहे. याला काही महिन्यांचा वेळ लागणार असला तरी त्यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना होणाऱ्या महापालिकांत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबईसह नऊ महापालिका आहेत. 

उत्सुकता संपणार
राज्याच्या नगररचना विभागाच्या आदेशाने निवडणुकीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अनेक महिन्यांपासून असलेली निवडणुकांची उत्सुकता संपणार असून कार्यकर्त्यांमध्ये कामाला लागण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून नियोजनाकडे कल दिसणार आहे.

ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत . मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा ५ सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. यात अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!