ज्येष्ठ नागरिकाला व्हाट्सएप व्हीडिओ कॉल उचलणे पडले महागात…
ज्येष्ठ नागरिकांनो काळजी घ्या, 14 लाख रुपये उकळले

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ नागरिकांच्या असहायतेचा गैरफायदा घेत अनेकदा त्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येते आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
झाले असे, येथील एका ज्येष्ठ नागरिकाला सकाळी आंघोळ करताना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलमुळे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भामट्यांनी १४ लाख ६६ हजार रुपयांची उकळणी केली.

या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी… छत्रपती संभाजीनगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाला आंघोळ करताना आलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’, अशी धमकी देत महिलेसह संशयित आरोपींनी १४ लाख ६६ हजार रुपये उकळले. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
गारखेडा परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त व्यक्तीच्या तक्रारीनुसार, ते २३ मार्चला सकाळी स्वच्छतागृहात आंघोळ करीत असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता. त्यांनी कॉल उचलला असता, समोरून एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत बोलत होती.
त्या अवस्थेत तिने या नागरिकाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. थोड्याच वेळात त्यांना हेमंत मल्होत्रा नावाच्या व्यक्तीने कॉल केला. ‘तुमचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आमचे प्रमोद राठोड साहेब तुमच्याशी बोलतील’, असे त्याने सांगितले. काही वेळाने दुसऱ्या क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील व्यक्तीने ‘आपण प्रमोद राठोड पोलिस बोलत असून, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये जायचे नसेल तर सेटलमेंटसाठी मल्होत्राला बोला’ असे सांगितले.
या नागरिकाने घाबरून पुन्हा मल्होत्राला कॉल केला असता त्याने ‘पोलिसांना सांगून सेटलमेंट करू’, असे सांगत विविध क्यूआर कोडवर व बँक खात्यात एकूण १४ लाख ६६ हजार रुपये उकळले.
ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
ज्येष्ठ नागरिकांच्या असहायतेचा गैरफायदा घेत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही घडले आहेत. आपल्यावरही अशी वेळ यायला नको, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नाशिक येथील जय शंकर विजयंगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमतर्फे करण्यात आले आहे.






