आरोग्यआर्थिककरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रराजकीयविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

वृद्धांच्या आयुष्याला आधार देणारा प्रकल्प

एक दिवसापासून ते कायमची राहण्यासाठी वृद्धांना व्यवस्था

जगातून संस्कारांची पिढी नष्ट होवू पाहत असतानाच वृद्धांसाठी एक वेगळी व्यवस्था नाशिक शहरात उभी राहिली आहे. खास ज्येष्ठ नागरिकांच्या सेकंड इनिंगचा विचार करून जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदास्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये वेगळ्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. अगदी कमी कालावधीत या प्रकल्पाची नाशिकसह राज्यभर दखल घेतली गेली. दिवसभराचा आनंद देणारे हे ठिकाण म्हणजे वृद्धांसाठी मोलाचा आधार ठरले. या प्रकल्पाच्या निमित्ताने वृद्धांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करतानाच अतिशय सुंदर घरांची निर्मिती खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांचा विचार करून उभारण्यात आली आहेत. 

जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने प्रशस्त वाचनालय… फिरण्यासाठी प्रशस्त परिसर… शंकर महाराजांचे मंदिर… मनोरंजन… व्हायफायची सुविधा… प्रत्येक रुमसाठी स्वतंत्र टिव्ही… एका रुममध्ये फक्त दोन जणांना राहण्याची व्यवस्था करतानाच प्रत्येक रुमसाठी गॅलरीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विविध प्रकारचे खेळ इथे उपलब्ध करून दिले आहेत. यात आवर्जून उल्लेख करता येईल तो म्हणजे सुमारे पंधरा ते वीस प्रकारचे विविध खेळ या प्रशस्त एक एकर जागेत उपलब्ध करून दिले आहेत. 

वैद्यकीय व्यवस्था इथे उपलब्ध आहे…

वृद्धांना उतारवयात सर्वात महत्त्वाची गरज असते ती आरोग्याची… उतारवयात इथे राहणा-या नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी इथे केअर टेकर, नर्सेस, डाॅक्टर्सची व्यवस्था करण्यासोबतच काैन्सिलिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय गरजेनुसार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडून व्यायामाचे प्रकार करून घेतले जातात. संचालकांकडून इथे राहणा-या वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाते. गप्पा, विविध विषयांवर चर्चा, याही वयात छंद जोपासण्यासाठी वृद्धांना व्यस्त ठेवले जाते.

सात्विक भोजन व्यवस्था

इथे कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या वृद्धांना त्यांच्या वाढत्या वयाचा आणि तब्बेतीचा विचार करून भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने बीपी, डायबेटीस किंवा वृद्धापकाळात भेडसावणा-या आजारांचा प्राधान्याने विचार करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

प्रशस्त वाचनालयाची उभारणी

ज्येष्ठ नागरिकांची वाचनाची आवड लक्षात घेवून या ठिकाणी प्रशस्स वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. यात अगदी पौराणिक, धार्मिक पुस्तकांसोबतच अन्यही विविध विषयांवरील सुमारे सात हजार पुस्तके वृद्धांना वाचनासाठी येथील वाचनालयात उपलब्ध करून दिली आहेत. येथील वाचनालयाला भेट दिल्यानंतर अनेक जण या वाचनालयासाठी पुस्तके भेट म्हणून पाठवत असतात, हेही विशेष म्हणता येईल. या ठिकाणी उभारण्यात आलेले वाचनालय अल्पावधीतच वृद्धांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

वैयक्तिक लक्ष

जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबच्या निमित्ताने देशातील आगळा वेगळा प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्यात आला. वृद्धांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी दिवसभर शिवसुमन आनंदाश्रमचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे वृद्धांच्या सेवेत असतात. उतारवयात इथे राहणा-या वृद्धांना आनंदी आयुष्य जगता यावे, या उद्देशाने अध्यक्षांचे वैयक्तिक लक्ष असते. आपल्याच कुटुंबातील सदस्य मानून सर्व वृद्धांसाठी हे ठिकाण म्हणजे मोठा परिवार बनले आहे. 

नाममात्र शुल्क

वृद्धांच्या वाढत्या वयाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेकदा केअर टेकरकडून घरी फसवणूक होण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी आपण बघतोय. केअर टेकरवर होणारा खर्च आणि संपूर्ण २४ तास केअर टेकर नेमण्यासाठी मोठा खर्च करणे अनेकांना पडवडत नाही. वृद्धांची होणारी हेळसांड आदी गोष्टींचा विचार करून नाशिकच्या गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन आणि शिवसुमन आनंदाश्रमात दरमहा कमी शुल्क आकारून वृद्धांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था विजयकुमार इंगळे यांच्या टीमने उपलब्ध करून दिलीय. राज्यभरातील वृद्धाश्रमांचा अभ्यास करून घरासारखे वातावरण इथे वृद्धांना व्यवस्था उभी करून दिलीय.

एक दिवसापासून ते कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था

आजच्या वाढत्या धकाधकीच्या आयुष्यात पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने परिवारातील वृद्धांना पूर्णवेळ सेवा देणे अनेकांना अवघड बनते आहे. शिवाय वृद्धांना वाढत्या वयात संवाद साधणारे, कुणीतरी समवयस्क घटक बोलण्यासाठी नसल्याने अनेकदा वृद्धांमध्ये चिडचिडेपणा, डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स, नैराश्य आदींसारखे आजार वाढताहेत. वृद्धांमधील व्याधी कमी करण्यासाठी किंवा त्यांना समवयस्क वृद्धांची सोबत असावी या उद्देशाने इथे व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा कुटुंबातील सदस्यांना कुटुंबातील कार्यक्रमाच्या निमित्ताने अथवा नातेवाईकांमधील समारंभासाठी जावे लागल्यास कुटुंबातील वृद्धांजवळ कोणी थांबावे… असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी नाशिकच्या गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमात एक दिवसांपासून ते कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. अतिशय कमी शुल्क आकारून केअर टेकर उपलब्ध करुन देतानाच निवासासाठी व्यवस्था इथे उभी करण्यात आली आहे. या सुविधेचाही नक्कीच नागरिकांनी लाभ घ्यावा.


वाढत्या गरजा लक्षात घेवून प्रकल्पाची निर्मिती

एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असतानाच कुटुंबाला संस्कार देणारी वृद्धांची पिढी जगातून नष्ट होते आहे. मात्र या वृद्धांच्या पिढीला निरामय आयुष्य जगता यावे… शांत आणि निसर्गरम्य वातावरण… तेही अगदी शहरापासून हाकेच्या अंतरावर… आपत्कालिन परिस्थितीत हाॅस्पिटलची सुविधा असो वा डाॅक्टर्सची सुविधा… वृद्धांच्या वाढत्या वयाचा आणि गरजांचा विचार करून उभी राहिलेली व्यवस्था हे गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमने विचारपूर्वक उभे केले आहे. मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने… हे ब्रीद घेवून संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे आणि त्यांच्या टीमने उभा केलेला प्रकल्प नक्कीच वृद्धांचं राहिलेले आयुष्य आनंदी करण्यासाठी नक्कीच मोलाचा आहे. 

आपणही इथे संपर्क करू शकता… 

8888897857… 9637523284… 7720030574…

पत्ता आहे – जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गोवर्धन शिवार, गंगापूर गावाच्या पुढे, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!