संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका प्रतिज्ञेचे वाचन
सातपूर येथील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज ayojn


सातपूर : येथील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथे २६ नोव्हेंबर बुधवार रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळगाव बहुला हायस्कूलचे प्राचार्य रोहित गांगुर्डे व सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश सातपुते यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान उद्देशिका यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.



प्रा. रोहित गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान उद्देशिका प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. रोहित गांगुर्डे सर यांनी भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगितले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी मार्गदर्शन करून डॉ. आंबेडकरांचे भारतीय संविधान लिहिण्यामध्ये अतिशय कष्ट आहेत याविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. तसेच ते भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते.

प्राध्यापक ललिता धुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना मार्गदर्शन केले, संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही तर ते आपल्या देशाची ओळख आहे ते आपल्याला स्वातंत्र्य, न्याय ,समानता आणि बंधुता यासारखी मूलभूत मूल्ये प्रदान करते, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानाच्या तत्त्वांचे पालन करणे आणि लोकशाही वरील आपला विश्वास कायम ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे मार्गदर्शन उपस्थितांना केले.

यावेळी विद्यार्थी परिचारिका प्रतिमा गावित, रेश्मा घोगरे ,अंजली पठारे या सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधाना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




