करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

सेवा पंधरवडानिमित्त स्वच्छता अभियान

कुसुंबा येथील श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालयात उपक्रमाचे आयोजन

नितीन इंगळे (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी, धुळे)

धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालयात सेवा पंधरवडानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न
सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबा संचलित श्रीमती एन. एन. सी. महाविद्यालय कुसुंबा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान संपन्न झाले.
दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाविद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा सर्व स्वयंसेवकांनी घेतली.
कार्यक्रमाला प्रा. एस. पी. पवार (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), प्रा. आर. पी. बिडगर (राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!