आरोग्यमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरसामाजिक

वणी ग्रामीण रुग्णालयात 23 सप्टेंबरला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

स्वस्थ नारी सशक्त भारत अभियानांतर्गत उपक्रमाचे आयोजन

वणी : येथील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक २३/९/२०२५ रोजी स्वस्थ नारी सशक्त भारत अभियान घेण्यात येणार आहे, यामध्ये महिला व १२ वर्षाखालील मुलांसाठी तज्ञ डॉक्टर जसे की स्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ , त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ यांच्या सुविधा स्त्रिया आणि नागरिक यांना मिळणार आहे आणि वाढते कर्करोगचे प्रमाण पाहता त्यांच्यासाठी गर्भपिशवी. मुख कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोग यांची मोफत तपासणी होणार आहे शिवाय एन.सी.डी.तपासणी, आहार व पाळीच्या काळातील स्वच्छता किशोरवयीन मुले मुली यांच्यासाठी समुपदेशनदेखील होणार आहे तसेच मुलांचे लसीकरण व गर्भवती महिलांची तपासणी व गरज असल्यास औषधे देण्यात येणार आहे. या दिवशी आपल्या ग्रामीण रुग्णालय वणी येथे रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात येणार आहे तरी दि.२३/९/२०२५ रोजी सकाळी१० ते दुपारी २ च्या दरम्यान आपण या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!