करिअरमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

रोहिदास हाके यांच्या “वाचन संस्कृतीची वाटचाल” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पुस्तकांमुळे केवळ शब्द संपदाच नाही तर विचारही समृद्ध होतात : प्रा. डॉ. दत्ता परदेशी

(नितीन इंगळे विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)

धुळे : वाचन संस्कृती वाढवणे हा वाचनालयाचा उद्देश आहे, तर पुस्तकामुळे कमकुवत मनाला सकारात्मकतेचा धीर मिळतो. तरुण पिढींना खूप ताण असतो. जो पुस्तकांच्या वाचनामुळे निश्चितच कमी होऊ शकतो. वाचन केल्यानेच पुढील पिढीची वैचारिक पातळी वाढते आणि विचार प्रगल्भ होतात. पुस्तकांमुळे केवळ शब्दसंपदाच नाही तर विचारही समृद्ध होतात. ज्याचा जीवनावर नेहमीच सकारात्मक परिणाम होतो. रोहिदास हाके यांचे “वाचन संस्कृतीची वाटचाल” हे ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्याना उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्धार नासिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांनी काढले.

अध्यक्षस्थानी भाजपचे नानाभाऊ वाघ हे होते तर प्रमुख पाहूणे माजी सरपंच विठ्ठल बागुल, सदस्य देवीदास हाके, जगन्नाथ शिंदे, मच्छिंद्र वाघ, सरदार हाके आदि मान्यवर उपस्थित होते. वाचनसंस्कृतीची वाटचाल ह्या रोहिदास हाके यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. दत्ता परदेशी यांच्या शुभहस्ते उडाणे वाचनालय येथे संपन्न झाले. डॉ. परदेशी पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, “वाचेल तो वाचेल” हे खरे असले तरी वाचन जेवढे आवश्यक आहे तेवढेच काय वाचतो हे देखील महत्वाचे आहे. मनाला संवेदशील बनवणारी आणि वैचारिक पातळी वाढणारी पुस्तके वाचण्याची आजही काळाची गरज आहे.

लेखक रोहिदास हाके म्हणाले की, बालकांमध्ये आणि तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. पुस्तकामुळे आयुष्याकडे बघण्याचा केवळ शब्द संपदाच नाही तर विचार समृद्ध होतात. नाना वाघ म्हणाले की, वाचनामुळे कुठल्याही विषयावर आपली मते बनतात आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. आज वाचनासाठी अनेक साधने सुविधा उपलब्ध असूनही आजची तरुणपिढी मात्र यापासून दूर जात आहे. कारण ती मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली आपणास पहावयास मिळते. यामुळे वाचन संस्कृती दिवसेंदिवस नष्ट होत चाललेली आहे असे चित्र निर्माण होत आहे. म्हणूच बालक तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. यासाठी ग्रंथालय यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी गरज समाजामध्ये निर्माण झालेली आहे. प्रस्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष व लेखक रोहिदास हाके यांनी केले. आभार उपाध्यक्ष बापू शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!