



राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचलित, कै. प्रा. आर. के. रकिबे. अंध विद्यार्थ्यांचे निवासी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र. कृषी नगर, कॉलेज रोड नाशिक येथे व्हीज़न एड या संस्थेकङून विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्हिजन एड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंहन, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश, कौशल्य विकास प्रकल्पाच्या समन्वयक श्रीमती आरती ताकवने, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारत सचिव जगदीप कवाळ, संघमित्र अजित कुलकर्णी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.










