करिअरमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

ब्राह्मण महासंघ, आरंभ सामाजिक संस्था व नासिकचा राजा सूर्यप्रकाश नवप्रकाश मंडळातर्फे गणपती बनवण्याची कार्यशाळा

ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : येथील नवीन नाशिकच्या ब्राह्मण महासंघ (सिडको विभाग), आरंभ सामाजिक सेवाभावी संस्था व नासिकचा राजा सुर्यप्रकाश नवप्रकाश कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, सावतानगर येथे संपन्न झाली. दिपिका पंचभैये यांनी सहभागी युवक – युवतींना मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

प्रमुख पाहुणे व नवीन नासिक (सिडको) विभाग पदाधिकारी यांच्या हस्ते सहभागी युवक – युवतींना प्रमाण पत्रक देण्यात आले. या कार्यशाळेसाठी श्रमिक सेना कार्याध्यक्ष/ब्राह्मण महासंघ शहरअध्यक्ष भगवंत (बाळासाहेब) पाठक, नासिकचा राजा मंडळ व महानगर गणेश उत्सव महामंडळ अध्यक्ष समीर (भाऊ) शेटे, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल पाटील उपस्थित होते. ब्राह्मण महासंघ प्रदेश अध्यक्ष, शासकीय योजना प्रसार व प्रचार विभाग भूषण जुन्नरे, शहर उपाध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी, ब्राह्मण महासंघ महिला शहर अध्यक्षा सोनाली कुलकर्णी, सातपुर विभाग अध्यक्ष निलेश जोशी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण महासंघ नवीन नासिक (सिडको) विभाग अध्यक्ष किरण कुटुंबळे, कार्याध्यक्ष देवा देशपांडे, मंगेश जोशी, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत नाईक, अद्वैत जोशी, अशोक निसाळ महिला समिती अध्यक्षा अर्चना उपासनी, प्रीती जोशी, शाल्मली गदगे, कल्याणी कुलकर्णी, नयन कुटुंबळे, श्रद्धा जोशी आदींसह मान्यवरांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!