करिअरमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

सूरज खलाणे यांची धुळे जिल्हा ग्रामीण प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती

नेर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात नेर येथील तरुण, तडफदार सामाजिक कार्यकर्ते सुरज निंबा खलाणे यांची धुळे ग्रामीण जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे पत्र त्यांना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विलासरावजी पाटील यांच्यातर्फे देण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळ्यातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट सुशीलजी महाजन हे उपस्थित होते.

महासंघाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, त्यास मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करील असे यावेळी खलाणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नियुक्तीप्रसंगी धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आर के माळी, धुळे शहर महानगर अध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, धुळे तालुकाप्रमुख जितेंद्र माळी, चैत्राम भदाणे, राजेंद्र गवळे, डॉ. मधुकर चौधरी, अनिल बिरारी, प्रतीकबाबा माळी, संदीप माळी, सुनील माळी, अरुण माळी आदींसह समाजबांधव उपस्थित होते. सुरज खलाणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!