विशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

शुक्ल यजुर्वेदीय माध्यानदिन ब्राह्मण संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न

अध्यक्षस्थानी सतीश शुक्ल यांची उपस्थिती

पंचवटी (प्रतिनिधी) : शुक्ल यजुर्वेदीय माध्यानदिन ब्राह्मण संस्थेत इयत्ता १०वी ते पदव्युत्तर चे गुणवंत विद्यार्थी तसेच इयत्ता ५वी व ८ इयत्तेचे स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी तसेच पाठशाळेच्या ६० विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल हे होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य अविनाश बल्लाळ आणि श्री संजय जोशी हे होते.
यावेळी प्रा अविनाश बल्लाळ यांनी ”आजचा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. मुलांचे मनोबल त्यांची निश्चित दिशा आणि तार्किक क्षमता ही नव्या युगातील यशाची त्रिसूत्री आहे. काळ बदलला आहे, बदलतो आहे. गतकाळातील अनेक अभ्यासपद्धती आज उपयोगी असतील असे नाही. आज मुलांना स्पर्धेचा तंत्र, संवाद, कौशल्य, डिजिटल लीडर्स, इमोशनल इंटेलिजन्स, इनोव्हेशन शिकवले जाते. कृती संकल्पना आणि सर्जनशीलता विचारसरणी हे शिकवण्यासाठी पालकांनी स्वतः आधी समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.

मुलांच्या जगात वावरताना पालकांनी मार्गदर्शक व्हावे, कंट्रोलर नाही, तेव्हाच मुलांना हे आनंदाने मजा देणार ठरेल, असे सांगितले. प्रमुख पाहुणे संजय जोशी यांनी ”भारतात जन्म मिळणेही दुर्लभ आहे . ही भूमी अवताराची महामुनींची साधुसंतांची आहे. याच भूमीतून culture आणि Agriculture श्रेष्ठ बनवून विश्वात पोहचविण्याचे काम ब्राह्मणांचे आहे. त्यासाठी प्रत्येक ब्राह्मणांनी आपले स्वतःचे जीवन भव्य दिव्य उदात्त श्रेष्ठ व आदर्शवत बनायला हवे. श्री विष्णुसहस्त्रनामात ब्राह्मण तर वैदिक प्रार्थनेत ब्रह्म वर्चस्वी म्हणजे ब्रह्मतेजयुक्त ब्राह्मणांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे, उपजीविकेचे शिक्षण उत्कृष्टात उत्कृष्ट रीतीने मिळविणे आणि सर्वच भौतिक क्षेत्रात नवनवीन कीर्तिमान स्थापन करायचे आहेतच. पण त्याचबरोबर जीविकेचाही विसर न पडू देता ब्रह्मज्ञान प्राप्त करणे… हेच ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यावर आपले खरे ध्येय आहे. ” असे प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वेदमूर्ती रवींद्रशास्त्री पैठणे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना आचारधर्माचे महत्त्व सांगून सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिनचर्या कशी असावी ते सांगून त्यांचे महत्त्व सांगितले. संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना संस्थेतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था कार्यवाह धनंजय पुजारी यांनी सर्व उपस्थित त्यांचे स्वागत केले. सौ ऋत्विका शौचे यांनी स्वागत गीत म्हटले यावेळी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्रघोष केला. सुहास भणगे यांनी बक्षीसांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राजश्री शौचे, राजन कुलकर्णी यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी यांनी केले. गुणवंत विद्यार्थी यादीवाचन उदय जोशी, महेंद्र गायधनी, भुषण शुक्ल, मंजुषा अगस्ते, राजन कुलकर्णी यांनी केले. यावेळी सतीश शुक्ल, ऍड. भानुदास शौचे, वैभव दीक्षित, मालती कुरुंभट्टी, रवीदेव, अनिल देशपांडे,वप्रतीक शुक्ल, धनंजय पुजारी, मंजुषा अगस्ते, ऍड प्रणिता कुलकर्णी,महेंद्र गायधनी, चंद्रकांत महाजन, सुहास भणगे, उदय जोशी, अर्चना रोजेकर, सुभाष भणगे, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, रोहिणी कुलकर्णी,उपेंद्र देव, रत्नप्रभा गर्गे, रामकृष्ण उपासनी, अवधूत कुलकर्णी, रोहिणी जोशी, रघुनाथ जोशी, प्रमोद मुळे, प्रा.डाॅ. लक्ष्मीकांत भट, विश्वास पुराणिक, प्रशांत गर्गे, रवींद्र रोजेकर, ऋत्विका शौचे, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, गजानन जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!