Uncategorizedशहरशैक्षणिकसांस्कृतिक

शिंदे येथील हॅपी होम प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जयंती विविध उपक्रमांनी साजरी

नाशिक (वार्ताहर) : राष्ट्रीय दूष्टिहीन संघ भारत व राष्ट्रीय दूष्टिहीन संघ महाराष्ट्र यांचा संयुक्त विध्येमाने चालवल्या जाणार्या हॉपी होम प्रशिक्षण व पुनर्वासन केंद्र शिंदे गाव येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जयंतीचे अवंछिते साधुन श्री संजय परदेशी यांच्यातर्फे सवस्थेस किराणा देण्यात आला या प्रसंगी उपस्थित मानेवराच्या हस्ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा प्रतीमेचे पुजण करण्यात आले.

संजय परदेशी, अभय छल्लाणी, अजित कुलकर्णी यानी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व उपस्थिताना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अभय छल्लाणी यांचा भा.ज.पा प्रदेश सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्ता संजय परदेशी, संघमित्र अजित कुलकर्णी, भा.ज.पा प्रदेश सदस्य अभय छल्लाणी, जगदीप कवाळ, सचिव, राष्ट्रीय दूष्टिहीन संघ भारत,. अजंना बोराडे कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय दूष्टिहीन संघ महाराष्ट्र, रमेश बोराडे, अनेश गावित, शशिकांत पाटील, दिनेश साळुखे व प्रकल्पातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन जगदीप कवाळ यांनी केले आणि आभार अंजना बोराडे यानी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!