कृषीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण – २०२५ : केंद्रीय समितीचा निफाडमधील कारसूळचा दौरा

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत कारसूळमध्ये समितीच्या सदस्यांचे स्वागत

पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी) : “रांगोळ्यांतून साकारली शिस्त, औक्षणात उमटला आदरभाव, ढोलताशांच्या निनादात गूंजली कारसूळ नगरीची स्वाभिमानी कहाणी नव्याने नव्याने ठाव.!” निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या कारसूळ गावाला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत केंद्रीय समितीचा दौरा झाला. यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी सजवून, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मुलींनी औक्षण व पुष्पवृष्टी करत शाल व बुके देऊन स्वागत करण्यात आले. या केंद्रीय पथकात संशोधन मूल्यांकन अधिकारी नासिर तडवी, नदिम तडवी, स्वच्छ भारत मिशन अभियंता जि.प. सागर रोडे, पं.स. अभियंता अनिल बैरागी, निफाड प.स. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत बोरसे सहभागी होते.


दौऱ्यादरम्यान पथकाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसरातील स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, तसेच ग्रामस्थांची मानसिकता व सहभाग या मुद्द्यांवर आधारित गुणांकन केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी परिसर, तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालये, शौचालयांचा वापर, हात धुण्याच्या सवयी, कचऱ्याचे वर्गीकरण यांसह विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी केली.

यांचा सहभाग उल्लेखनीय

या दौऱ्यात सरपंच मनिषा काजळे, उपसरपंच शामराव शंखपाळ, सदस्य देवेंद्र काजळे, स्वाती काजळे, आशा ताकाटे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी निलेश गडाख, आरोग्य सेवक मयूर क्षिरसागर, शिपाई नंदु गांगुर्डे, संगणक चालक गौरव साळवे, पा.पु. कर्मचारी युवराज गांगुर्डे, रोजगार सेवक गोरख गुंबाडे, अंगणवाडी सेविका शोभा शिंदे, छाया अभंग, सुनिता गांगुर्डे, मदतनीस शिला पवार, शशिकला वाघमारे, पुनम ताकाटे, आशा सेविका वैशाली कंक, आशा ताकाटे, तसेच पीएमश्री शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम, जिजा वसाळ, रविंद्र सोसे, संतोष निरभवणे, भाग्यश्री खैरनार, रोहिदास तळले, प्रिती चौधरी, जनता विद्यालयचे मुख्याध्यापक मोनाली पिंगळे, सागर जाधव, मोनाली कोकाटे, अलका उगले, मोहिनी आहेर, प्रतिभा क्षिरसागर, दिपाली पवार, जयश्री रसाळ, अमोल गुंजाळ, संदीप बोचरे, ग्रामस्थ साहेबराव पगार, बाळासाहेब शंखपाळ, दिलीप ताकाटे, खंडेराव शंखपाळ, सचिन वाघचौरे, सोमेश्वर जाधव, संदीप काजळे, संतोष ताकाटे, प्रसाद जाधव, बबन ताकाटे, सुनिल ताकाटे, नंदिप गाडे, वायरमन पुरुषोत्तम कदम, सुभाष निकम व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!