माझी आई – माझं आधारस्तंभ – तीचं नाव अनामिका
रिद्धी विसपुते मैंद, वासननगर, नाशिक.


आई म्हणजे जणू एक जिवंत देवता. तिचं अस्तित्व म्हणजेच प्रेम, त्याग, आणि ममतेचं प्रतिक. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई.
लहानपणापासून ती मला सगळं शिकवत आली – चालायला, बोलायला, चांगलं–वाईट ओळखायला. तिने माझ्यासाठी अनेक अडचणींना सामोरं गेलं, पण कधीच तक्रार केली नाही. तिचं प्रेम न बोलता समजतं, तिचं अस्तित्व न पाहताही जाणवतं.
आईचं मन खूप मोठं असतं. ती स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून आमच्यासाठी झटत असते. म्हणूनच मला वाटतं की, “आई” या शब्दाचा अर्थ कोणत्याही शब्दात मावणार नाही.
आई, तू माझं जग आहेस. तुझं उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. 💯


माझी आई – माझं शक्तिस्थान
माझी आई म्हणजेच माझं सर्वस्व. ती एक अशी व्यक्ती आहे जिने आयुष्यभर न थकता, फक्त आमच्यासाठी जगण्याचा निर्णय घेतला.
माझी आई म्हणजे एक अजोड व्यक्तिमत्व. ती फक्त माझी आई नाही, तर माझं संपूर्ण जग आहे. ती खूप कष्टाळू आहे आणि तिने आमच्या आयुष्यात प्रत्येक भूमिका पार पाडल्या आहे – आई, बाबा, सखी, मार्गदर्शक… सगळं!
मी आठवीत असताना पप्पा गेले. तो काळ खूप कठीण होता. त्या क्षणाने आमच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ – सगळं जबाबदारी आईवरच आलं. पण आईने कधीच हार मानली नाही. ती धीराने, प्रेमाने, आणि अतूट जिद्दीने आम्हाला वाढवलं. या काळात आमच्यासाठी खंबीरपणे उभी राहिली ती आई.

आईने घरसंसार नीट सांभाळला, आमचं शिक्षण थांबू दिलं नाही, आम्हाला चांगल्या मार्गावर घातलं. माझं लग्न तीने मन लावून केलं. माझ्या डिलिव्हरीचं, आजारपणाचं काळात देखील ती माझ्यासोबत होती – दिवसरात्र, एक क्षणही सोडला नाही. तिने स्वतःच्या दुःखावर झाक घालून आमचं आयुष्य उभं केलं.
आज जे काही मी आहे, ते फक्त तिच्यामुळे. तिचं प्रेम, तिचा त्याग आणि तिचं ममत्व माझ्या प्रत्येक श्वासात आहे. ती देव नाही, पण देवापेक्षा कमीही नाही.

आई, तूच माझी शक्ती आहेस. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे, तुझ्या प्रत्येक हसू मागे, माझं संपूर्ण आयुष्य उभं आहे.
आज मी जे काही आहे, ते आईच्या मुळेच. ती फक्त आई नाही, ती माझं बळ आहे, माझं हसू आहे, माझा जीव आहे.
आई, तुझ्यासारखी आई मिळणं म्हणजे पुनविच्या रात्री चंद्र जवळ येणं!
तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक हसू – माझ्या हृदयात कोरलेलं आहे.
आई, मी तुला मनापासून प्रेम करते. सगळे दिले मला आयुष्याने … आता एकच देवाकडे मागणे.. प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय
माझ्या आईसाठी एक छोटीशी कविता
आई तू माझं आभाळ आहेस,
दुःखातसुद्धा शांत सावली,
तुझ्या कुशीत सापडते शांतता,
तुझ्या स्पर्शात असते देवता.
पप्पा गेल्यावर तूच पप्पा झाली,
सांभाळली घर, पोरं, जबाबदारी आली,
माझं लग्न, माझं मातृत्व…
सर्वच तू मनापासून पार पाडलं.
अनामिका नाव तुझं, पण ओळख जगावेगळी,
कधी न थकलेली, कधी न झुकलेली…
तू आहेस आई, आमचं जगणं –
सतत झगडणं, पण प्रेमाने फुलवणं.
स्वतःची भूक हरपून आमचं पोट भरलंस आई,
तुझ्या हाताला सुगंध फुलांचाही कमी वाटतो,
पप्पा (विजय विसपुते) गेल्यावर झाली तू धीराची भिंत,
तीन लेकरांना दिलं तू सुरक्षित छत,
रिद्धी, सिद्धी, कार्तिकेश हे तुझं विश्व,
आई (अनामिका) , तूच आमचं सर्वस्व

(माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.
विजयकुमार इंगळे
संपादक
विकासाची वाट न्यूज
📎लेख पाठवण्यासाठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक : 7720030574



