

नितीन इंगळे (विकासाची वाट जिल्हा प्रतिनिधी)
धुळे – समाजाचं देणं लागतो या भावनेतून अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत असतात. प्रसिद्धीपासून लांब राहत ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ अनेक जण बाळगून असतात. त्यात उल्लेख करता येईल उडाणे येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल राजाराम बागूल यांचा… कन्या कु. वेदिका हिच्या जन्मदिवसाचे केवळ औचित्य मानून उडाणे येथील जिल्हा परिषदेतील 220 विद्यार्थ्यांना डिजिटल ओळखपत्र तयार करून देत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विठ्ठल बागूल यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या उडाणे शाळेतील इयत्ता तिसरीच्या शाळेचे वर्गशिक्षक राजू लक्ष्मण शिंदे यांनीही यानिमित्ताने वर्गासाठी स्टँडिंग फॅन भेट देत विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून असलेली आपली प्रतिमा अधोरेखित केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीट विस्तार अधिकारी सी. के. पाटील, केंद्रप्रमुख जगदीश बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ वाघ, भैय्या हालोर, रघू बागूल, ज्ञानेश्वर हालोर, ग्यानू मासुळे, गोरख हालोर, भटू बागूल, मन्साराम हाके, गोरख बागूल, मुख्याध्यापक झालटे, छायादेवी अहिरराव, मनीषा पाटील, शिक्षक महाले, संध्या पाटील, संगीता बोरसे, अंगणवाडी सेविका तसेच वेदिकासह तिचे वडील विठ्ठल बागूल उपस्थित होते. सामाजिक कार्याच्या निमित्ताने नेहमीच सकारात्मक भूमिकेतून उडाणे येथील ग्रामस्थांचे पंचक्रोशी योगदान राहिले आहे.

नम्र आवाहन, आपणही आपले 13 रुपये सत्पात्री दान आपल्या सोयीने वृद्धाश्रमाला देवू शकता…
नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास आपणही 13 रुपयांची मदत करू शकतात. आपल्याला स्वेच्छेने सामाजिक कार्यासाठी 13 रुपये दान करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता. अधिक माहितीसाठी 8888947979 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
आपली 13 रुपयांची मदत देण्यासाठी क्यूआर क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.




