शहरसामाजिक

अंतापूरचे सामाजिक कार्यकर्ते भागाराम महाजन यांचे निधन

सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड

सटाणा (वार्ताहर) : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते भागाराम भिका महाजन (मानकर) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या भागाराम महाजन यांच्या अकाली निधनाने एक हाडाचा कार्यकर्ता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. महाजन यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पदे भूषवली होती. सामाजिक सलोखा राखण्यापासून ते वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक तसेच अन्यही क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या मागे गोविंदा भिका मानकर, शामराव माधवराव मानकर, सुरेश भिका मानकर, मनोहर बंडू मानकर, सुनील उखा मानकर, रवींद्र भिका मानकर, रामचंद्र भिका मानकर, वसंत भिका मानकर, हेमंत भागाराम मानकर, महेश भागाराम मानकर यांसह मोठा मानकर परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!