नाशिकमध्ये उभी राहतेय व्यवसायाची भक्कम साखळी… बचत गटांना या व्यवसायात कायमस्वरूपी विक्रीव्यवस्था झालीय उपलब्ध
शेवगा लागवड… शेवग्याच्या पाल्यापासून तयार केलेल्या भुकटी पावडर विक्री व्यवस्था, मोफत प्रशिक्षण मिळणार


नाशिक (वार्ताहर) : शेवगा पावडरला जगभरात मोठी मागणी वाढली आहे, त्यामुळे बचत गटांना शेवगा पावडर व्यवसाय वाढवण्याची संधी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विक्री करता येते.
शेवगा पावडर निर्यात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात बचत गटाच्या महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. शेवगा पावडर तयार करण्याचे, पॅकिंग आदींबाबत मोफत प्रशिक्षण नाशिकमध्ये देण्यात येणार आहे. शेवगा पावडर व्यवसायात सहभागी बचत गटाच्या शहर आणि ग्रामीण भागातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शेवगा पावडर व्यवसायातील नोंदी
शेवग्याच्या उच्च प्रतीची (quality) पाने वापरा.
पावडर बनवताना स्वच्छतेची (hygiene) काळजी घ्या.
आपल्या उत्पादनाची जाहिरात करा. (बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे)
व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी:
शेती किंवा पाला खरेदी करण्याची व्यवस्था, पावडर बनवण्यासाठी मशिनरी, पॅकेजिंग साहित्य, मार्केटिंग आणि विक्रीसाठी व्यवस्था.
हेही महत्वाचे…
दुधाला पर्याय म्हणून शेवगा पावडर अत्यंत लाभदायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही शेवगा पावडर आवडते, असं रांचीच्या विनोबा भावे विद्यापीठातील आयुर्वेदिक डॉक्टर व्ही. के. पांडे यांनी सांगितलं.
शेवगा पावडरमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्याला परिपूर्ण अन्न (कंप्लिट फूड) म्हटलं जातं. त्यात जीवनसत्त्वे, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ओमेगा 3 ॲसिड, कॅल्शियम, प्रथिने, फॅटी ॲसिड्स यांसारखे घटक आढळतात, असंही डॉक्टर पांडे यांचे म्हणणे आहे.
शेवगा पावडरमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्याला परिपूर्ण अन्न (कंप्लिट फूड) म्हटलं जातं. त्यात जीवनसत्त्वे, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ओमेगा 3 ॲसिड, कॅल्शियम, प्रथिने, फॅटी ॲसिड्स यांसारखे घटक आढळतात. शेवगा पावडरमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असल्यामुळे ते शरीराला ताकद देण्याचं काम करते. तसेच शरीरातील हिमोग्लोबिनही वाढवते. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शेवग्याच्या सेवनाने शरीराला स्फूर्ती मिळते. दिवसभर ताजंतवानं आणि सक्रीय राहण्यास मदत होते, असं डॉ. पांडे सांगतात.
शेवगा पावडर व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. योग्य नियोजन आणि मेहनतीने हा व्यवसाय यशस्वी करता येतो. शेवगा लागवड अथवा शेवग्याच्या पाल्यापासून तयार केलेल्या भुकटीची मागणी पूर्ण करणाऱ्या बचत गटांसाठी नाशिक शहरात घरपोच खरेदी व्यवस्था सुरू होते आहे. व्यवसाय सुरू करू शकणाऱ्या सदस्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बचत गटाच्या सदस्यांना आवाहन
शहरी आणि ग्रामीण भागातील बचत गटांच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या महिला सदस्यांना मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांना याचा लाभ होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण आणि शहरातील बचत गटाच्या महिलांच्या परस्पर समन्वयातून हजारो महिलांना कायमस्वरूपी घरच्या घरी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

विजयकुमार इंगळे : संपादक : विकासाची वाट न्यूज
संधी रोजगाराच्या : 8888947979



