‘बापाविना’ पोरांची मायेची पखरण : माझी माय ‘आई’
प्रा. वैशाली कोकाटे (अधिव्याख्याता, सामाजिक कार्यकर्त्या, नाशिक)


सतत कामात असणे आणि ‘सामाजिक’ असणे जिच्या रक्तातच आहे, ती माझी माऊली निफाड तालुक्याचे माजी आमदार कै. दुलाजी सिताराम पाटील ह्यांचे पाच नंबरचे आपत्य म्हणजे माझी आई सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे ह्यांची काकु म्हणजे माझी आई.
आमचे वडील मी ९ वी इयत्तेत असताना माझ्या पाठचा भाऊ ७ वीत आणि लहान भाऊ ४ थी इयत्तेत असताना अचानक आम्हाला सोडून गेले. कधीही नोकरी न करणाऱ्या माझ्या आईने खंबीरपणे मॉन्टेसरी कोर्स केला व अभिनव बाल विकास मंदिर येथे नोकरी स्वीकारली टी जशी आमची आई होती तशी त्या चिमुकल्यांची पण शिक्षिका व माय बनली.

जिच्या हातून कारल्याची भाजी सुद्धा कडू होत नाही किंवा लागत नाही. आमच्या गावचे पाहुणे देखील आल्यानंतर ‘ताई तुझे हातचे कारलेच कर’ असं हक्काने सांगत. गावातल्या प्रत्येकाला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट झाल्यानंतर डबा पुरविणार हक्काच घर म्हणजे माझ्या ताईचे घर वाटाव इतकी सामाजिक राहणारी सर्व पुतणे, पुतण्या, भाच्या ह्यांना ‘ताई’ म्हणजे आईच्या पेक्षा जास्त प्रेम देणारी आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी माझी आई बापविना पोरक्या लेकरांची मायेची पाखरण : पांघरून बनली ‘माझी आई’ नोकरी करून नोकरीत विशेष काम करून आदर्श शिक्षिका तसेच आम्हाला वाढविण्यात कोणतीच कमी न उरता.

मी जे काही आहे ते आईमुळेच वेळ पडली की गालात मारणारी दहावीचा अभ्यास करतांना मला पहाटे उठल्यानंतर डुलकी लागली तर आईने खाडकन कानाखाली वाजविली त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही उत्तरोत्तर प्रगती जीवनात घडू लागली मी प्राध्यापिका झाले तर एक भाऊ इंजिनिअरिंग कॉलेज (नामांकित) प्राध्यापक म्हणून काम करत आहे. तसेच एक लहान भाऊ कंपनीत आहे. माझे लांब आणि जाड कमरेखालीपर्यंत केस ही फक्त आईची देन. तिने वाटीभर तेल रोज गरम करून डोक्याला मसाज करायचा व पक्क्या वेण्या घालून द्यायच्या व वर्षभर शिकेकाई (मसाला) बनवून ठेवायचा व त्यानेच तिच्या हाताने केस धुवायचे. सर्व सेट्ल्ड आहेत ‘नातू – नातवंड – नाती’ ह्यांचा फुललेला परिवार आणि आजही ७६ वर्षात वाखणण्याजोगा उत्साह पै पाहुणे नवीन रेसेपीज करून नातंवांणा खाऊ घालणे हाताला असलेली तिच चव अजुनही कमी झालेली नाही.
म्हणूनच सर्वांना हवी हवीशी वाटणारी ‘माझी आई’ हिला ईश्वर उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
(लेखिका वैशाली कोकाटे या सामाजिक कार्यकर्त्या असून नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.)
आमची किटी पार्टी…
✍🏻सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून किटी पार्टीच्या निमित्ताने सामाजिक चळवळ भक्कम करणाऱ्या आपल्या महिला मंडळांची यशोगाथा नक्कीच पाठवा… सोबत मंडळातील महिलांचे, उपक्रमांची छायाचित्रे आवर्जून पाठवावीत. नक्कीच आपल्या किटी पार्टीच्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
📞7720030574 या व्हाट्सअप क्रमांकावर सविस्तर माहिती पाठवा.
विजयकुमार इंगळे : संपादक : विकासाची वाट न्यूज
