उद्योग व व्यवसायकृषीमहाराष्ट्रविशेषसामाजिक

अंतापूरच्या नानाजी जाधव यांना वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कार जाहीर

१ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत वितरण

सटाणा (वार्ताहर) : तालुक्यातील अंतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शेतकरी नानभाऊ जाधव यांना यंदाचा वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रु.३५०००/- (रुपये पस्तीस हजार फक्त) रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सविस्तर वृत्त असे,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै “कृषिदिन” हा दिवस वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कै. वसंतराव नाईक यांचा ११२ वा जन्मदिवस व कृषिदिन मंगळवार दिनांक १ जुलै, २०२५ रोजी आयोजित केला असून याप्रसंगी कृषि व तत्सम विषयात उल्लेखनीय विशेष कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतक-यांना व संस्थाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शुभहस्ते वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या वर्षी वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कारासाठी नानाजी जाधव यांची निवड करण्यात झाली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र, जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई येथे मंगळवार दिनांक १ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.
नानाभाऊ जाधव यांना यापूर्वीही शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांची दखल घेत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नानाभाऊ जाधव यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!