आरोग्यशहरशैक्षणिकसामाजिक

डॉ. विजय बिडकर महाविद्यालयात “सुंदर आरोग्य – सुंदर व्यायाम” कार्यशाळा संपन्न

अभोणा येथे जागतिक योग दिन साजरा

प्रा. रवींद्र पगार (कळवण तालुका वार्ताहर)
कळवण : डांग सेवा मंडळाचे डॉ. विजय बिडकर महाविद्यालय अभोणे आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ” सुंदर आरोग्य सुंदर व्यायाम ” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आलेले होते. अध्यक्षस्थानी मा. शेखरजी जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र देसाई, सरपंच सुनिताताई पवार उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरेश मगरे यांनी केले. या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. संदीप खेडकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी योगाविषयी प्रबोधन करून प्रात्यक्षिक दिले तसेच फिट इंडिया मिशनची संकल्पना स्पष्ट करून सांगितली.

आजच्या काळातील अनेक आजारापासून स्वतःला वाचविण्यासाठी आहार, योगा, व्यायाम आणि ज्ञान अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी सविस्तर सांगितले. या कार्यशाळेत क्रांतीलाल राठोड, क्रांतीलाल पवार धनश्री पवार ठाकरे सर व त्यांची सर्व टीम यांनी प्रत्यक्ष योगाचे आणि व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचा उपस्थितांनी योग्य तो लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मा शेखरजी जोशी यांनी प्रतिपादन केले की फिट इंडिया मिशन हे योगाद्वारे घराघरात पोहोचले पाहिजे. कारण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मीना पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

📎
साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रथा, परंपरा, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा... त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!