आरोग्यशहरशैक्षणिकसामाजिक

सारडा कन्या शाळेत योगदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

जागतिक योग दिवस

पंचवटी (वार्ताहर) : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या शाळेत २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळ सत्रात इ.५वी ते ७वी साठी योग शिक्षिका संगीता आंभोरे यांनी योगाचे महत्त्व सांगून योग ही प्रामुख्याने एक आध्यात्मिक शिस्त आहे, ज्यात जीवनशैलीचे संपूर्ण सार आत्मसात केले गेले.

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे.योगामुळे एकाग्रता वाढते व मन व आरोग्य चांगले राहते, असे सांगून प्राणायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, पदहस्तासन, वज्रासन, धनुरासन, भुजंगासन, चतुरंगदंडासन, त्रिकोणासन इ. योगासने प्रात्याक्षिके करण्यात आली.

इ.८वी ते १०वी दुपार सत्रात शाळेत् डॉ.अर्चना तोंडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.तोंडे यांनी आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व विशद करताना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक यादृष्टीने आरोग्याचा जीवनावर काय परिणाम होतो? हे सांगितले.

यावेळी मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण आदी सहभागी होते. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक संजय मेहरखांब यांनी केले.परिचय संगीता अंभोरे यांनी करून दिला. कार्यक्रमास विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षकेतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!