
(अष्टाक्षरी)
हवाहवासा वाटतो
जननीचा तो पदर
मिळते उब प्रेमाची
नाना रंगाचा बहर
सुखदुःखाच्या क्षणात
येतात अश्रू नयनी
पुसण्यासाठी धावतो
आधार त्याचा जीवनी

पडतो कामाचा लोढ
खोसताच येते बळ
माहेरहून् निघता
ओटीत मिळे नारळ
रात्री वाटते भीती
ठेवतो घट्ट धरून
थंडीत कुडकुडता
ऊबदार पांघरून
लपाछपी खेळतांना
लपवतो क्षणभर
घाम पुसण्यासाठी तो
लगेंच असतो तत्पर
उन्हाच्या कडक्यात
सावली देतो डोक्यावर
सुसंस्काराचे प्रतिक
पदर हा डोईवर
(कवयित्री मोनाली राकेश पाटील या उपक्रमशील शिक्षिका असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो.)


📎
साहित्य पाठवा…
आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील बातम्या, ललित लेख, प्रवासवर्णन, कविता, अनुभव, बालपण, प्रबोधनात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य विषयांवर लिहू शकणाऱ्या वाचकांनी आपले साहित्य नक्कीच पुढील मोबाईल क्रमांकावर पाठवा... त्यास नक्कीच यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल…
✍🏻
विजयकुमार इंगळे, संपादक
विकासाची वाट न्यूज
📞8888947979



