
(नितीन इंगळे : विकासाची वाट न्यूज वार्ताहर)

धुळे (वार्ताहर) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुसुंबा भि. येथे दाखलपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कुसुंबा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.सी.के.पाटील, भावेश भारत बागुल, स्थापत्य अभियंता सहाय्यक धुळे केंद्र प्रमुख जगदीश बडगुजर, मधुकर हालोरे, मीरा देवरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय भिल उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला वस्तीमधून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश, शुज, सॉक्स वाटप करण्यात आले. मुलांसोबत शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.सी के पाटील, केंद्रप्रमुख जगदीश बडगुजर तसेच शिक्षकांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.





