जगण्याचा अर्थ सांगून गेलेली आमची माय…
कल्पना सदाशिव पाटील (अध्यक्षा, महिला अल्पबचत संघटना, अमळनेर)

आमची आई शिकलेली नव्हती, मात्र आम्हा भावंडांच्या अस्तित्वाचा धागा होती… आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी केलेला त्याग हे आमच्या जीवनात असलेला अतुलनीय आधार होती. तिची पालनपोषण करणारी उपस्थिती ही जीवनातील वादळांमध्ये असलेला आरामाचा दिवा होती.

माझी आई काही शिकली नव्हती… पण तिने लोकांचे धुणे भांडी करून आम्हा नऊ भावंडांना चांगलं शिक्षण दिले आम्ही पाचही भावंडांना चांगलं शिकवले. चार भावांना ग्रॅज्युएट केलं. एकाला शेती करायला घरीच ठेवलं. चारही भाऊ चांगल्या उच्च पदावर आणि आम्ही 4 बहिणी. मी आमच्या घरात सर्वात सर्वात लहान. तिघी बहिणी दुसरीपर्यंत शिकल्या. मी कुटुंबात सर्वात लहान असल्याने माझे शिक्षण दहावीपर्यंत झाले.
कुटुंबातील मुलींनी शिकायचं नाही म्हणून त्या तिघींना शिकता आले नाही आणि घरात अठरा विश्व दारिद्य्र… आमचे वडील हमाली करायचे. त्या वेळेस आम्ही नऊ भावंडं म्हणून आईने तिघी बहिणींना कामाला लावलं… मुलांना चांगलं शिक्षण दिलं. भाऊ ऑफिसर झालेत… मग मी लहान असल्यामुळे मला भावाने शिकवले… माझ्या आईबद्दल काय लिहावे? ती अडाणी असून फार हुशार होती. भावंडांचे शिक्षण, लग्न सर्व हातावरचे..

चारही बहिणींना जसे लग्नाचे स्थळ आले तसे हातमजुरीवाल्यांना दिलं पण आमच्या आईचे संस्कार आम्हाला फार उपयोगी पडले.
आपल्या मुलांसाठी नेहमी कष्ट करणारी… त्यांची काळजी घेणारी ती एक माय माऊली आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाहीत..सदा सर्वदा कुटूंबातील सर्व सदस्यांची काळजी करणारी.. काळजी घेणारी आमची आई होती…

आमच्या आईने हातावर नऊ भावंडं सांभाळले. आज आम्ही सर्व भाऊ, बहिणी सुखी आहोत, ते आमच्या आईमुळेच… काय लिहावं? त्या माऊलीबद्दल… स्वतः उपाशी राहून आम्हाला खायला दिलं… मोठं केलं… माझी आई छान ओवी पण म्हणायची पण मी तिच्या ओवी काही लिहून ठेवल्या नाहीत. माझ्या आईला जाऊन चार वर्ष झालीत, तरी वाटतं की आई आमच्याजवळच आहे.

तिने कष्ट करून मोठा मुलगा DFO झाला, दुसरा मुलगा जिल्हा परिषद सदस्य तर तिसरा मुलगा उनपदेव येथे फॉरेस्ट खात्यात… चौथा मुलगा शेती करतो तर पाचवा एलआयसी आणि पोस्टात सेवा देतोय… त्या माऊलीने दिलेले संस्कार सोबत असल्याने आज आम्ही भावंडं आनंदी आयुष्य जगतोय… मोठी नात न्यूयॉर्कला … माझी मुले युरोप आणि दुबईला आहेत… आईमुळेच मलाही प्रेरणा मिळाली… माझी आई नऊ भावंडं सांभाळू शकते तर मी माझ्या दोन मुलांना ME, MBA करू शकले. मी माझ्या आईची प्रेरणा घेऊनच मुलांना युरोप आणि दुबईला नोकरीच्या निमित्ताने पाठवलं. मी पण माझ्या आईच्या पावलंवर पाऊल ठेऊन हातमजुरी तसेच पोस्टची एजसी घेऊन एलआयसी माझ्या मिस्टरांची… माझ्या मुलांना शिक्षण दिलं फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच… ना घर ना शेती…
(लेखिका कल्पना सदाशिव पाटील, अध्यक्षा, महिला अल्पबचत संघटना, अमळनेर)
📎
(माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.
📎लेख पाठवण्यासाठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक : 7720030574



