महिलाविकासाची वाट न्यूज विशेषसामाजिक

वात्सल्यारूपी झरा…

स्नेहा शिंपी, साहित्यिक, पंचवटी, नाशिक.

माझी आई…
आई ही ह्रदयातून आलेली प्रेमळ साद, हाक असते.. आपल्या जीवनावर व अस्तित्वावर प्रेमळ विश्वासाची सावली असते. जिथे फक्त प्रेमचं मिळतं अन विश्वासातलं एकमेव स्थान म्हणजे आई असते. तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठे ही मिळत नाही.

मायेची ऊब देणारी आई म्हणजे देवाचे दुसरे रूप आहे. देवाने प्रत्येकाला सुखद आनंद देणारी व पदोपदी सांभाळून घेणारी सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. त्यामुळेच मातृपणा च्या श्रुणातुन कोणीही मुक्त होवू शकत नाही. माझी आई सोज्वळ, सुस्वभावी ,मनमिळाऊ व इतरांच्या मदतीला पुढे अशी तिची ख्याती आहे. तिला कोणाशीही स्पर्धा करायले आवडत नाही कारण स्पर्धेत अहंकार, द्वेष व नयुननगंड निर्माण होतो अशी तिची मनोधारणा आहे. याचबरोबर आपण कोणासाठी किती आणि काय करू शकतो यांकडे लक्ष दद्यायला हवे, अशी शिकवण कायम तिची असते. आईची शिकवण आम्ही भावंडे तंतोतंत पाळतही असतो. आईचे चांगले संस्कार आपल्या पुढील जीवनात खुपच फायदेशीर ठरत असतात. पाककृतीत आई अगदी सुगरण. विविध प्रकारच्या पदार्थांत तिचा हातखंडच असायचा. मी सातवीत असताना आईला स्वयंपाकात पुष्कळ मदत करायची. आवड तिथे सवड असे म्हणतात. त्यामुळे खुप लवकर मी स्वयंपाक शिकले. हळूहळू इतर ही पदार्थ बनवण्यात रस वाटू लागला. आई प्रमाणेच मी पण पाककृतीं मध्ये तरबेज होत गेली.

उत्साह वाढत गेला. मग मी स्पर्धेत भाग घेऊ लागले. माझ्या पाककृतींची प्रथम क्रमांक मिळायचा त्यामुळे माझ्यात प्रचंड आत्मविश्वास जागृत झाला. खुप लवकरच मी यश संपादन केले. मग मी एकाच पदार्थांपासून अजून नाविन्य व विविधता बनवण्यात यश संपादन केले. २००६ पासून मी अनेक मासिकांतून रेसिपीज लिहिले. पाककृती प्रसिद्ध होत गेल्याने माझा उतसाह व आनंद द्विगुणित झाला. मग मी माझा मोर्चा टीव्ही शोज कडे वळवला.

मी झी मराठी , ई . टीव्ही मराठी व साम मराठी वरील पाककृतींच्या कार्यक्रमात सहभागी होवून पाककृती करून दाखवले. एका मागून एक असे बरेच कार्यक्रमात मी सहभागी झाले. आई कडून मिळालेला हा अनमोल वारसा आपण पुढः चालवण्यात यश प्राप्त केले याचा आनंद व समाधान नक्कीच होतय. आज या कामगिरी मुळे आपली एक नवी ओळख व अस्तित्वव निर्माण झाले याचे पुर्ण श्रेय आईलाच. या क्षेत्रात नवे व्यासपीठ मिळाले ते केवळ आईने तरबेज केल्या मुळेच.. म्हणूनच आई एक वातसलयरूपी झराच आहे. आईचे मनापासून आभार मानले पाहिजे. तिच्या आशिर्वादा मुळेच मी थोडातरी खारीचा वाटा उचलू शकली.. त्मयामुळे मनापासून थॅक्यू आई ..

(लेखिका स्नेहा मुकुंद शिंपी यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख दैनिकांमध्ये नियमितपणे प्रसिद्ध होत असतात.)

📎
(माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.)
📎लेख पाठवण्यासाठी व्हाट्सएप संपर्क क्रमांक : 7720030574

विजयकुमार इंगळे
संपादक
विकासाची वाट न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!