उद्योग व व्यवसायमहाराष्ट्र

धुळे जिल्ह्याच्या 25 गावांतील शेतकऱ्यांना मोफत भुईमूग बियाणे वाटप

तेल बिया संशोधन केंद्र जळगाव व चौगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने

(नितीन इंगळे, धुळे वार्ताहर यांजकडून)

धुळे : धुळे तालुक्यातील चौगाव गावात तेल लबिया संशोधन केंद्र जळगाव व चौगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील 25 गावामधील शेतकरी बांधवाना मोफत भुईमूग बियाणे वितरण करण्यात आले. तेल बिया संशोधन केंद्रामार्फत महाराष्ट्र राज्यात तेलबियावर्गीय पिकाच्या लागवडीखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना सदर तेलवर्गीय पीक लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून भुईमूग बियाणे वितरण करण्यात आले.

वाटप कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ संशोधन सहाय्यक जळगाव तुषार बिरारी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक जळगाव दिनेश पाटील, डॉ. दिनेश नांद्रे, धुळे कृषी विज्ञान केंद्र प्रमुख मनोहर पाटील, कुसुंबा पि.यु. व्यवस्थापक विनोद मासुंळे, कंपनीचे अध्यक्ष सौ. सुरेखा बोरसे, उपाध्यक्ष विनोद हालोर, सचिव रामभाऊ मोरे, संचालक भूषण देवरे, सोसा. संचालक किरण मोरे, ज्ञानेश्वर शेवाळे, जयेश बोरसे, छोटूलाल सोनवणे, कृष्णा महाले, रामराव खैरनार आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!