
वृत्तसंस्था : गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं. विमान अपघातातून चमत्कारिकरीत्या बचावलेले विश्वास कुमार यांची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेत अपघाताची माहिती जाणून घेतली तसेच तब्येतीची विचारपूस केली.
अपघात कसा घडला? याची माहिती देतानाच व्हीडिओ नक्कीच बघा (सौजन्य : डीडी न्यूज)
या घटनेत 204 लोकांचे प्राण गेले आहेत. तर एका ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचले आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी 41 जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर प्रकारातलं 787-8 हे विमान होतं.






