महिला

संगीता वाणी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

आई कुठे काय करते?" मालिकेतील सिनेअभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण


कोल्हापूर (वार्ताहर) : येथील शिक्षक फाउंडेशन संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील उपक्रमशील शिक्षिका संगीता वाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.
पिंपरखेड येथील माध्यमिक विद्यालयातील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षिका असलेल्या संगीता वाणी यांना यापूर्वीही विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील वाणी यांच्या योगदानाची दखल घेत कोल्हापूर येथे “आई कुठे काय करते?” मालिकेतील सिनेअभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते तसेच प्रसिद्ध कवी रोहित शिंगे, तसेच अध्यक्ष दीपक चामे यांच्या उपस्थितीत पुरस्कार जाहीर करण्यात आला. संगीता वाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!