ज्येष्ठांच्या वाढत्या वयातील गरजांचा विचार करून नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी राहण्यासाठी व्यवस्था गंगापूर गावाजवळ
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी राहण्यासाठी व्यवस्था...


शांत वातावरण… शहरापासून हाकेच्या अंतरावर…


नाशिक (वार्ताहर) : शहरापासून अगदीच जवळ असलेले ठिकाण म्हणजे जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब… खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उभा राहिलेला प्रकल्प… आयुष्याकडे आपला बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निरोगी आयुष्य देत असतो… एका बाजूला आपण पाहतोय की, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेऊन केअर टेकरकडून अनेक ठिकाणी फसवणूक होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत… मात्र अशा वेळी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने घरातील ज्येष्ठ नागरिकांना वेळ देणे अनेकदा बऱ्याच जणांना शक्य होत आहे.
अशा सर्व बाबींची गरज ओळखून नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी किंवा काही दिवस राहण्यासाठी… शांततेत आयुष्य जगता यावे, समविचारी, समवयस्क लोकांचा सहवास महत्त्वाचा असतो… यासह अन्य बाबी लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रस्त्यावर शिवसुमन आनंदाश्रमात व्यवस्था उभी राहिली आहे… खूप गर्दी करून न घेता मोजक्याच लोकांना राहण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे…

शांत वातावरण, प्रशस्त एक एकर जागेत… श्री शंकर महाराज यांचा मंदिर परिसर… विविधभारतीवर प्रसारित होणाऱ्या गाण्यांचा आनंद… वाचनालय… यासह अन्य व्यवस्था असलेला जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब… कुठेही वृद्धाश्रमाचे स्वरूप येऊ दिलेले नाही… अगदी घरासारखी वेगळी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे…

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेरून कोणी अन्नदान करण्यासाठी परवानगी नाही… आयुष्यात स्वाभिमानाने आयुष्य जगलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोणी दिलेले अन्नदान योग्य वाटणार नाही, यासाठी इथे काळजी घेण्यात आली आहे… इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या घरांची व्यवस्था खास चर्चेत आहे… भविष्यातील गरजांचा विचार करून या घरांची व्यवस्था करण्यात आली आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ रस्त्यावर गंगापूर गावाजवळ जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन संचलित शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक प्रकारची घरे या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्यासाठी जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबतर्फे संचलित आनंदाश्रमात सर्व सोयींनी युक्त तयार केली आहेत. आयुष्याची संध्याकाळ आपल्या मनाप्रमाणे व समवयस्क ज्येष्ठ नागरिकांसोबत… सोयी सुविधांनीयुक्त- डे केअर- अंथरुणावर खिळलेल्या- चालते फिरते… एकाकीपणा दूर करण्यासाठी… 24 तास डॉक्टरांच्या आश्वासक देखरेखीखाली… नर्सेस, केअरटेकर…
आनंदी वातावरणात सेकंड इनिंग सुखी करण्यासाठी सर्व सोयी असलेला योग्य निवारा इथे अनुभवायला मिळणार आहे.
जय शंकर विजयंगण सीनिअर सिटीझन क्लब आणि “शिवसुमन आनंदाश्रम इथे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना छान सुविधा नाममात्र दरात करण्यात आली आहे.
(मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने हे ब्रीद घेऊन उच्च शिक्षित संचालक मंडळाने या प्रकल्पाची उभारणी केली आहे. विजयकुमार इंगळे हे या प्रकल्पाचे संस्थापक असून भविष्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना इथे राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेली घरे कायमस्वरूपी राहण्यासाठीउपलब्ध करून दिलेली आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्यासाठी जायचे असल्यास येथील संपर्क क्रमांक असे आहेत.
संपर्क : 7720030574, 9657865966, 8888947979.
☘️नाशिकपासून जवळच गंगापूर गावालगत निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेला जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, नाशिक- 422 222.
(मनोरंजन, अन्य सुविधा तसेच धार्मिक, अध्यात्मिक वातावरण, श्री सदगुरु शंकर महाराज मंदिर परिसरात उभारणी करण्यात आलेला वृद्धाश्रम)








