महाराष्ट्र

शांतीदूत एज्युकेशन सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारीपदी आशिष कोकरेंची निवड


नाशिक : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी पदावर आशिष कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी कोकरे यांची नियुक्ती केली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात संस्थेतर्फे वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. कॅन्सरग्रस्त गरजू, गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये मोफत भोजन व्यवस्था, वृद्धाश्रम, केअर सेंटर, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, आईवडील नसलेल्या 65 गरजू, गरीब विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येते. कोकरे यांनी आजपर्यंत पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा दिली आहे. याशिवाय वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरवण्यात आले आहे. आशिष कोकरे यांच्या नियुक्तीनंतर संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!