सामाजिक

वृद्धांच्या आयुष्यात आनंदाची संजीवनी देणारं ठिकाण… वृद्धांना कायमस्वरुपी राहण्याचीही सुंदर व्यवस्था

देवाजी तनपुरे, अशोक स्तंभ, नाशिक.


वृद्धांसाठी खूप छान प्रकल्प नाशिकच्या गंगापूरजवळ उभा झाला आहे. जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. आमच्याही ग्रुपला आधी याबाबत कुतूहल होते. म्हणून आम्हीही या ठिकाणी ग्रुपने नव्वद ज्येष्ठ नागरिक जाऊन आलो. बसची व्यवस्था या क्लबकडूनच केली जाते. शिवाय राहण्यासाठी सुंदर व्यवस्था आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या घरांमध्ये केलेली आहे.

गंगापूर गावाजवळ दत्त धामकडे जाताना अलिकडेच हे ठिकाण आहे मुक्त विद्यापीठ रस्त्यावर. आमची तारीख ठरल्यानंतर आम्हाला बस घ्यायला आली होती सकाळी साडेआठला वेळेत, इथेच आम्ही प्रभावित होउन गेलो.
वृद्ध लोकांसाठी एवढे कोणी करत नाही, मात्र त्यांच्यासाठी आधार देणारे अध्यक्ष आणि येथील टीम म्हणजे देवाने वृद्धांची काळजी घेण्यासाठी पाठवलेले दूत आहेत.
आम्ही इथे आल्यानंतर आमचे स्वागत झाले, त्यानंतर इथे उभारण्यात आलेल्या अवलिया शंकर महाराजांची देखणी मूर्ती पाहिल्यावर पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झाली…
सर्व काही विसरून गेलो. आरती झाली, मग काय गाण्यांवर आम्ही सगळे नाचायला लागलो. त्यानंतर चहा नाश्ता घेतला… नाश्ता म्हणजे अनलिमिटेड मिसळपाव… दुपारचे जेवण… सायं. पुन्हा चहा नाश्ता… केवळ नाममात्र शुल्कात हे सर्व… एवढी मोठी व्यवस्था वृद्धांसाठी आजपर्यंत कोणी केली नाही…

याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सोयींनी युक्त, वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर्स, नर्सेस, केअर टेकर आदींची व्यवस्था केली आहे, तेही नाममात्र शुल्कात… कपडे धुण्यासाठी आश्रमातर्फे व्यवस्था, सात्विक जेवण, सर्व सोयी…इथे उपलब्ध आहेत.*
अनेकदा वृद्धांची साधी दखल कोणी घेत नाही, त्यांना समजून घेतले जात नाही, मात्र इथे नक्कीच संस्कारांची आणि मायेची माणसं शंकर महाराजांनी पृथ्वीवर पाठवली आहेत, हे मात्र नक्की. या ठिकाणी लावलेली फलक आयुष्यात उभारी देतात, राहण्याची सोय खूपच सुंदर आणि घरपण देणारी… दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात गाणी, संगीत, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये जुन्या आठवणींना उजाळा… दिवस कुठे संपला? हे कळलेच नाही.

वृद्ध लोकांना एवढी मोठी उपलब्धी तीही केवळ चारशे रुपये शुल्क देऊन… केवळ ज्येष्ठ लोकांची सेवा म्हणून उभ्या केलेल्या या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला नक्कीच भेट द्या… आपल्यासाठी उभा राहिलेली ही सोय प्रत्येकाने पुन्हा पुन्हा अनुभवावी, अशीच आहे… आम्ही सर्व वृद्धांनी अनुभवलेली ही सफर कधीही विसरणार नाही. नेहमीच या ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपणही नक्कीच जा आणि पुन्हा पुन्हा अनुभव घ्या, आयुष्य किती बाकी आहे आपल्या वृद्धांचे पण या ठिकाणचा आनंद काही वेगळाच आहे. आयुष्यात राहिलेला आनंद देणाऱ्या गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आज शिवसुमन आनंदाश्रमातील दर्शनी भागात लावलेला “मी कोणी मोठा होतो, हे विसरा” हा फलक खूप काही अर्थ सांगून गेला… फक्त वृद्धांसाठी सुरू झालेल्या या पाळणाघराचा आनंद न घेता आपल्यासाठी निस्वार्थी भावनेतून उभारलेल्या सुंदर व्यवस्थेला पुढे नेण्यासाठी या युवकाला नक्कीच बळ द्या… नक्कीच अनुभव घ्या. या ठिकाणी जाण्यासाठी संपर्क क्रमांक हे आहेत 7720030574, 7721086778
वृद्धांचे जीवन सुंदर करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…
🙏🏻🙏🏻🙏🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!