
Vijaykumar.ingle@gmail.com
वृद्धापकाळ हा निसर्गचक्राचा एक भाग… मात्र बदलत्या जीवनशैलीमध्ये आज वृद्धांसमोर अनेक समस्या उभ्या राहतात. आयुष्यभर कौटुंबिक जबाबदारी पुढे नेतानाच कधी वार्धक्याकडे येवून पोहोचतो, हेही काळाच्या ओघात कळत नाही. सामाजिक बदलाचा भाग होतानाच कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या वाट्याला आलेले दुःखाचे प्रसंग अनेकदा आठवणींच्या हिंदोळ्यात दुःख देवून जातात. आयुष्यभर खस्ता खात कधी आनंदाचे तर कधी आयुष्याची कसोटी बघणारे क्षण अनेकांना चटका लावणारे ठरतात.
मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगताना कोणत्याही गोष्टीचा मोह न ठेवता वाट्याला आलेलं राहिलेलं आयुष्य व्यतित करताना वृद्धांना अपेक्षा असते ती संवादाची… मात्र आज संवादच हरवत चाललाय… समाजात वावरताना संवेदना बोथट होताहेत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे… नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडलेली पिढीही आजच्या धावपळीच्या जगात अडकून पडलीय. नोकरी, व्यवसाय वा तत्सम जबाबदाऱयांमुळे घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडलेल्या मुलांना घरात असलेल्या माणसांचा विसर पडतो की काय, हाही एक प्रश्न भविष्यात नक्कीच भेडसावणारा असेल.
वाढत्या वयामुळे जडलेल्या व्याधी, आपलं म्हणावं असं कुणीही वृद्धापकाळात जवळ नसणं, वाढत्या वयात स्वतःला सांभाळतानाच स्वतःच स्वतःचा आधार होणाऱ्या वृद्धांना गरज आहे ती मानसिक आधाराची… मात्र हाच आधार समाजातून कमी होताना दिसतो आहे. आयुष्यभर अनेक चढउतार पार करत समाजाला संस्कारांची सावली देणारी एक पिढी आपल्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, याचा आता सर्वांनी विचार करण्याची किंबहुना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
अपेक्षा काहीही नाहीत, फक्त आधार हवाय… मायेचा… संवादाचा… हाकेला ओ देणाऱया माणसांचा… मात्र हेच आता हरवत चाललंय… वृद्धापकाळ सुखकर व्हायचा असेल तर गरज आहे ती विरंगुळा केंद्रांची… वृद्धांना त्यांच्या काळात डोकावून पाहण्यासाठी बळ देण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. राज्यभर एकटेपणाने आजचा दिवस संपला… असे म्हणत रोजच्या दिवसाची वाट पाहत आयुष्याकडे बघणाऱया ज्येष्ठ नागरिकांना हवाय आधार… शब्दांचा… होय… असाच एक छानसा प्रयोग नाशिकमध्ये उभा राहिलाय… जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने… सिनेमा थिएटर, मनोरंजन, प्रशस्त वाचनालय, निसर्गरम्य ठिकाण, 24 तास केअर टेकर, नर्सेस, डाॅक्टर्सची उपलब्धता… राहण्यासाठी कायमस्वरूपी आगळी वेगळी घरे… नाशिक शहरालाच लागून असलेल्या गंगापूर गावाजवळ असलेल्या या विरंगुळा केंद्राच्या निमित्ताने नक्कीच एक चांगला उपक्रम वृद्धांसाठी उभा राहिलाय.
समाजाला दिशा देणाऱया या वृद्धांच्या संस्कारक्षम पिढीला आधार द्यायचा असेल तर नाशिकच्या गंगापूर येथे वृद्धांसाठी निसर्गरम्य परिसरात उभ्या राहिलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमसारख्या प्रकल्पांची नक्कीच गरज निर्माण झाली आहे. नाशिकच्या गंगापूरमध्ये उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाच्या निमित्ताने वृद्धांसाठी नक्कीच मायेचा आधार मिळालाय. समाजात वृद्धांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, हाकेला ओ देणारे समाजघटक, त्यांना समजून घेणारी पिढी जपत असतानाच वृद्धांसाठी नाशिकमध्ये सुरू झालेला विरंगुळा केंद्राचा प्रयोग नक्कीच समाजाप्रती आपुलकी जपणारा ठरतोय. समाजातून हरवलेला आवाज क्षीण होत असतानाच गरज आहे ती पुन्हा एकदा हरवलेला संवाद भक्कम होण्याची…
चला आपणही पुढाकार घेवून हरवलेला संवाद वाढवतानाच वृद्धांसाठी आधार होवूयात नाशिकच्या गंगापूरमध्ये सुरू झालेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमसारख्या प्रयोगाच्या निमित्ताने…
संवाद – 📞8888947979.





