

धडगाव : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटली गावाच्या शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी आंतरपिकांमध्ये बेकायदेशीररीत्या लागवड केलेली तब्बल ४४३ किलो गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत २ कोटी २१ लाख ५८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासोबत असलेल्या अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत घाटली गाबातील एका शेतात मका व तूर आंतरपिकांमध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली, माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक पाटील पथक तयार करून तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांच्या पथकाने घाटली गावातील संबंधित शेत शिवाराची पाहणी केली असता मका व तूर पिकांच्या आड गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ४४३ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणात शैलेश शंकर पावरा (रा. घाटली) या याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी वनजमिनीमध्ये मका यांनी व तूर या आंतरपिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड करून जोपासना केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, पुढील तपास सुरू अधिक आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमली पदार्याची बेकायदेशीर लागवड व तस्करीविरोधात पोलिसांकडून कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.






