ब्राह्मण महासंघ, नवीन नाशिक आणि आरंभ सामाजिक सेवाभावी संस्थेचा संयुक्त उपक्रम
शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न



नाशिक : येथील आरंभ सामाजिक सेवाभावी संस्था, नाशिक व ब्राह्मण महासंघ, नविन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत वीर सावरकर हॉल, सावतानगर येथे शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे हे ४ वर्ष होते. या उपक्रमास नागरिक, महिला बचत गट आणि शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकार सौ दिपीका पंचभाई यांनी लाल व शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवत विविध कलात्मक बाबींचे मार्गदर्शन केले.

सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करून या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रसंगी उपस्थितांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याबाबत व जलप्रदूषण टाळण्याबाबत जागरूक करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने सण-उत्सव साजरे करणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो,असे प्रतिपादन ब्राह्मण महासंघाचे बाळासाहेब पाठक यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुधाकर बडगुजर, अमोल नाईक, पवन मटाले, प्रविण कुलकर्णी, योगेश गांगुर्डे, निकिता पाठक, आरंभ सामाजिक संस्था नाशिक अध्यक्ष धनंजय पाठक संस्थेचे सचिव देवेंद्र देशपांडे उपस्थित होता यांच्या हस्ते सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आले..

या कार्यक्रमाचे आयोजन किरण कुटुंबळे, प्रशांत नाईक, प्रसाद कुलकर्णी, विजय जोशी, अर्चना उपासनी,प्रीती जोशी, कविता कुलकर्णी, नयन कुटुंबळे,मीना जोशीयांनी केले होते.. कार्यक्रमाला विद्यार्थीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रिती जोशी यांनी आलेल्या सर्व स्पर्धेकांचे आभार आणि स्वागत केले.





