सामाजिक बांधिलकी जपणारी नाशिकच्या उपनगर येथील स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था
लेखक - शरद कांबळे : आनंदी आयुष्य जगणारे संस्थेचे सदस्य



मॉर्निंग ग्रुप गांधीनगर ,नाशिक मधील जेष्ठ नागरिक यांची स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था ,उपनगर स्थापना करण्यात आलेली आहे.
स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था, उपनगर
अध्यक्ष रमेश मामा वाघ
उपाध्यक्ष .गणेशजी जाधव
सचिव दशरथ मोकळ
या संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे आमच्या संस्थेत कार्यकारणी ही ८० टक्के पदाधिकारी हे ज्येष्ठ नागरिक आहेत,त्यामुळे जेष्ठ नागरिकांना या त्यांच्या मावळतीला जाणाऱ्या सायंकाळी येणाऱ्या अडीअडचणी सोडवणे,त्यांना त्यांच्या मावळतीच्या सायंकाळी सुखा समाधानाने जगता येईल याकडे प्रामुख्याने पाहिले जाते.

जेष्ठ नागरिकांना या वयात घरगुती अडचणी जास्त असतात.जसे काही जेष्ठ नागरिकांची मुलं ही व्यसनी असतात,आई वडीलांना त्रास देतात, पेन्शन हिसकावून घेतात, घरात सून, मुल त्रास देतात, त्यांच्या गोळ्या औषधे वेळेवर देत नाही त्यामुळे नैराश्य आलेल्या जेष्ठ नागरिकांना आत्महत्या देखील कराव्या लागतात,या सर्वांच्या त्रासा पासून स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था ही ज्येष्ठ नागरिकांना मदत करीत असते.


समाजातील बरेच ज्येष्ठ नागरिक यांना त्यांच्या व्यथा कोणाला सांगता येत नाही, आशा जेष्ठ नागरिकांना वैयक्तिक रित्या मार्गदर्शन करून,त्यांचे आयुष्य सुखी करण्याचे काम करीत असते.
आमच्या संस्थेत सद्या ५० सभासद संख्या असून सभासद वाढविण्याचे काम जोमात सुरू आहे. सदरची संस्था ही रजिस्टर असून गेल्या तीन वर्षापासून नाव लौकिक मिळालेले आहे,आणि संस्थेचे ऑडिट साठी अ ग्रेड चा दर्जा मिळालेला आहे.
आमच्या संस्थेची कामे ही गाव खेड्यांतील मुलांना गरजेच्या वस्तू, शालांत उपयोगी वस्तू,गोरगरिबाना कपडे वाटप, अन्नदान,त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना आलेल्या किंवा येणाऱ्या अडीअडचणी यांच्यावर उपाय योजना,गौतम छात्रालय नाशिकरोड येथील वसतिगृह येथील मुलांना दरवर्षी वह्या पुस्तक यांचे वाटप, अन्नदान ई. उपक्रम राबवित असतो.
सदरची संस्था ही ज्येष्ठ नागरिकांना स्वाय स्पूर्तीने कसे जगता येईल याचे कटाक्षाने काम करते. संस्था चालविण्यासाठी आम्ही प्रत्येक सभासद यांचे कडून रक्कम रुपये पाचशे रुपये सभासद फी, आणि रक्कम रुपये पाचशे देणगी म्हणून स्वीकारतो, आमचे कार्यक्षेत्रातील कार्यक्षम नगरसेवक प्रशांतभाऊ दिवे यांनी आमच्या संस्थेसाठी प्रशस्त असा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. उपनगर पोलिस स्टेशनसमोर रामजी आंबेडकर हे सभागृह उपलब्ध करून दिले.
सर्वप्रथम नगरसेवक राहुलभाऊ दिवे यांचे आम्ही सर्व सभासद जाहीर आभार व्यक्त करतो. आमची संस्था दर महिन्याला कुठेतरी बाहेरगावी ट्रिपचे आयोजन करते.तिथे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक मनमुराद आनंद घेतात.या मागचा उद्देश फक्त एकच की, आमच्या सारखा आनंद प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी घेतला पाहिजे,आणि आयुष्याची मावळतीला झुकलेली सायंकाळ आनंदाने जगता यायला पाहिजे. आमच्या संस्थेत वय वर्ष ५८ पासून ते वय वर्ष ८६ पर्यंत जेष्ठ नागरिक आहेत.

नियमित मॉर्निंग वॉक करणे, हसी मजाक, आपल्यात असलेले स्तूप्त गुण दाखवणे,नाच गाणे करणे, विशेष म्हणजे प्रत्येक जेष्ठ नागरिकाला स्टेज डेरिग यायला पाहिजे, म्हणून त्यांचेकडून प्रॅक्टीस करून घेणे. ई अगदी सहज करून घेतो. त्याचा एक भाग म्हणून आम्ही नुकतेच गंगापूर गावाजवळ, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ येथे जेष्ठ नागरिकांसाठी जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब असून तिथे आम्ही आनंद उत्चव साजरा केला.
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब हा विजयकुमार इंगळे हे चालवतात. अगदी प्रत्येक व्यक्ती मागे त्यांना फक्त रक्कम रुपये १३.८० पैसे मिळतात, प्रत्येक व्यक्तीसाठी ते रक्कम रुपये ४००/- आकारणी करतात,त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायकली नाश्ता कढी भेळ आणि चहा यांचा समावेश असतो.
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब म्हणून हा क्लब सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी किव्वा संस्थेने याचा नक्की उपयोग करावा असे आम्हाला वाटते,
सदरच्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबचे संस्थापक अध्यक्ष हे विजयकुमार इंगळे हे आहेत आणि सदरचा क्लब हा भारतातील एक नंबरचा क्लब असेल, यात शंका नाही.







