करिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

नवोदय परीक्षेत हर्षल देशमुखचा राज्यात दुसरा क्रमांक

सुरगाणा तालुक्यातील गाडगा येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी

हिरामण चौधरी (विकासाची वाट प्रतिनिधी)

पळसन : जि. प. प्राथमिक शाळा गडगा येथील विद्यार्थी कु. हर्षल नंदकुमार देशमुख याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत 97.50% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे सुरगाणा तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
हर्षलने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्याने स्पेलिंग बी व मॅथ स्पर्धेत यश संपादन केले. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 ते 18 मार्च 2026 दरम्यान दिल्ली येथे आयोजित ‘ज्ञानयात्री’ शैक्षणिक सहलीसाठी त्याची निवड झाली होती.

याशिवाय, सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून 24 ते 25 मार्च 2026 रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या शैक्षणिक सहलीसाठीही त्याची निवड झाली आहे. या सर्व यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अल्फा देशमुख, विस्तार अधिकारी धनंजय कोळी, महेश नेहे, कुंताबाई भवर, केंद्रप्रमुख जीभाऊ नाडेकर, पांडुरंग वाघमारे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ललित खंबायत व सर्व सदस्यांनी हर्षलचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्याच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक चिंतामण महाले तसेच शिक्षकवृंद — नीलम साबळे, जगदीश पाडवी, अभिजीत घुले, तानाजी मेटे, योगेश महाले, देविदास देशमुख, योगेश खंबायत, श्रीकांत पवार, शांताराम महाले, प्रमिला देशमुख, डॉ. भास्कर देशमुख आणि पालक नंदकुमार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!