उद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

न्यू इंग्लिश स्कूल दिघावे येथील विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

निसर्ग चित्रकला व पर्यावरण सामान्यज्ञान स्पर्धेत विभागातून दोन पारितोषिके

सुभाष जगताप (प्रतिनिधी)

पिंपळनेर (प्रतिनिधी) -साक्री तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल दिघावे येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धा व पर्यावरण सामान्यज्ञान स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. निसर्ग मित्र समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा व पर्यावरण ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विभाग स्तरावर दोन पारितोषिके पटकावली आहेत.

पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता वाढावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल दिघावे येथील एकूण ११४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता. विद्यालयाने शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेतील चित्र रंगभरण स्पर्धेत इयत्ता ९ वी मधील कृतिका विजय अहिरे हिने विभागातून पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळविले. तिच्या या यशामुळे विद्यालयाचा गौरव वाढला आहे.

तसेच राज्यस्तरीय पर्यावरणीय सामान्यज्ञान स्पर्धेत इयत्ता ९ वी मधील कुमारी तनश्री धनराज पवार हिने विभागातून तृतीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. पर्यावरण विषयातील तिच्या ज्ञानामुळे तिने हे यश मिळवले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!