शिवसुमन वृद्धाश्रम – बदलत्या जीवनशैलीचा विचार करून उभारलेली व्यवस्था
नाशिकमध्ये उभा राहिला वृद्धांना राहण्यासाठी भक्कम आधार



मुंबई (विशेष प्रतिनिधी) – वृद्धाश्रमाचा विचार डोळ्यासमोर आला की अनेकांच्या मनात नकारात्मक भावना समोर येतात. मात्र शहरांचा वाढता विस्तार, कुटुंब पद्धतीत होत असलेले बदल, बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धाश्रम ही येणाऱया काळाची समाजातील मोठी गरज बनली आहे. वाढत्या वयानुसार येणारा एकाकिपणा, नोकरीनिमित्त मुलांना बाहेर राहावे लागणाऱ्या कुटुंबांसाठी, किंबहुना सुरक्षितता, हाकेला लगेच धावून येणारे सदस्य, वैद्यकीय मदत आणि वृद्धापकाळात आपल्याच वयाच्या समवयस्कांची साथ गरजेची असते. या सर्वांचा वविचार करून नाशिकच्या गंगापूर गावाजवळ जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबची सुरूवात झाला. या क्लबच्या माध्यमातून शिवसुमन वृद्धाश्रम चालवला जातो. केवळ वृद्धाश्रम म्हणून सेवा न देता काळाची गरज ओळखून नाशिकच्या गंगापूर येथे सुरू करण्यात आलेल्या या व्यवस्थेत वृद्धांच्या त्यांच्या वयातील आवश्यक गरजांचा विचार करून या वृद्धाश्रमाची रचना करण्यात आली आहे. शिवसुमन वृद्धाश्रमात ४० वृद्धांच्या राहण्याची व्यवस्था आहे. कमी शुल्क देवून राहण्यासाठी कॉमन व्यवस्थाही इथे उपलब्ध आहे. आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली घरे इथे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक घरात स्वतंत्र टीव्ही… व्हायफायची व्यवस्था… 24 तास वीज, पाणी… वैद्यकीय व्यवस्था… खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांचा विचार करून बनवलेली घरे… निसर्गरम्य परिसर… शंकर महाराज मंदिर परिसर… शुद्ध शाकाहारी भोजन… वाचनालय… मनोरंजन… सिनेमा थिएटर… शहराच्या गर्दी गोंगाट, प्रदूषणापासून दूर असलेला शहराजवळील परिसर…

असा आहे येथील पत्ता –
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब, गंगापूर गावाच्या पुढे, गोवर्धन शिवारात, मुक विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, नाशिक.
विजयकुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष… जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम… संपर्क क्रमांक आहेत – 8888897857… 7720030574… 9637523284…

यासाठी सुरू करण्यात आलीय शिवसुमन वृद्धाश्रमाची व्यवस्था –
संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट होऊन विभक्त कुटुंब पद्धती वाढल्यामुळे तसेच रोजच्या धावपळीच्या आयुष्यामुळे वृद्धाश्रम ही खरी गरज बनली आहे
- आज नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. अशा वेळी वृद्धांची काळजी घेण्याच्या उद्देशाने शिवसुमन वृद्धाश्रमाची व्यवस्था उभारली आहे.
- वाढत्या वयात आजारपण वाढते. कुटुंबात कोणीच नसेल तर वृद्धाश्रमात वैद्यकीय सुविधा आणि सेवा-सुश्रुषा वेळीच उपलब्ध करून दिली जाते. याच हेतूने शिवसुमन वृद्धाश्रमाची व्यवस्था उभारली आहे.
- कुटुंबातील सदस्य परदेशात किंवा दुसऱ्या शहरात गेल्यावर, घरात वृद्ध व्यक्ती एकाकी पडतात. वृद्धांच्या वयातील लोकांची साथ मिळाल्याने वृद्ध आपला रोजचा वेळ आनंदाने घालवू शकतात, म्हणून शिवसुमन वृद्धाश्रमाची व्यवस्था उभारली आहे.






नाशिकसारख्या धार्मिक नगरीत शिवसुमन वृद्धाश्रमाच्या निमित्ताने वृद्धांची चांगली सोय प्रदूषणमुक्त परिसरात करण्यात आली आहे. उतारवयात वृद्धांना शांतता प्रिय असते. अशी व्यवस्था नाशिकच्या गंगापूर येथे उभी करण्यात आली आहे. शिवसुमन हा वृद्धाश्रम नव्हे तर वृद्धांसाठी असलेला क्लब आहे. माववळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने… हे ब्रीद घेवून नाशिकच्या गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रस्त्यालगत जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबने शिवसुमन वृद्धाश्रमाची व्यवस्था बी केली आहे. या ठिकाणी केवळ राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील कोणीही वृद्ध कायमस्वरुपी राहू शकतो. या ठिकाणी वृद्धांना राहण्याबाबत अधिक माहितीसाठी – 8888897857… 7720030574… 9637523284… या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
या ठिकाणी श्रीकृष्णा गोशाळा उभारण्यात आली आहे. आपणही या सामाजिक कार्यात आपला हातभार लावू शकता. वृद्धांचा आधार असलेला प्रकल्प… मदतीसाठी क्यूआर कोड – शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, नाशिक.








